केंद्र सरकार 8 रुपये सवलतीच्या दरात 15 लाख टन चणा देणार!!; राज्यांच्या विविध योजनांना फायदा


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्र सरकार दर किलो मागे 8 रुपये या सवलतीच्या दराने चणा (हरभरा) राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना उपलब्ध करून देणार आहे. तब्बल 15 लाख टन एवढा स्टॉक यातून देशभरासाठी उपलब्ध होणार असून सुमारे एक वर्षभर केंद्र सरकार 8 रुपये सवलतीच्या दराने हा चणा राज्यांना उपलब्ध करून देणार आहे.  States to get 15 lakh tonne chana at Rs 8/kg discount for welfare schemes

केंद्र सरकार यासाठी सुमारे 1200 कोटी रुपये खर्च करणार असून राज्यांच्या मध्यान्य भोजनासारख्या विविध योजनांना या स्वस्त चण्याचा लाभ होणार आहे. त्याचबरोबर रेशन मधून धान्य खरेदी करणाऱ्या गरीब ग्राहकांना देखील यातून मोठा लाभ मिळणार आहे.

राज्य सरकारे आपल्या तिजोरीतून या चण्यावर आणखी सवलती देऊ शकतात. त्यामुळे पुढच्या सर्व सणासुदीच्या काळात चणाडाळ, तूरडाळ, मुगडाळ उडीद डाळ आदी डाळी देखील स्वस्त होऊन त्यांच्या किमती स्थिर राहणे अपेक्षित आहे. केंद्र सरकारने या दृष्टीने देखील उपाययोजना केली आहे. विविध राज्यांचा यासाठी प्रतिसाद अपेक्षित आहे.

सध्या देशभर या सर्व डाळी 70 ते 100 रुपये प्रति किलो या दराने खुल्या बाजारात उपलब्ध आहेत. परंतु केंद्र सरकारने सणासुदीच्या काळात या डाळींचे भाव खुल्या बाजारात देखील वाढू नयेत यासाठी उपाययोजना केली आहे.

States to get 15 lakh tonne chana at Rs 8/kg discount for welfare schemes

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात