Sri Lanka Crisis: आर्थिक संकट आणि प्रचंड विरोधादरम्यान श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षेंनी लष्करी विमानाने देश सोडून काढला पळ

वृत्तसंस्था

कोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी बुधवारी पहाटे देश सोडून पळ काढला. असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेने इमिग्रेशन अधिकाऱ्याचा हवाला देत वृत्त दिले आहे की, राष्ट्रपती, त्यांची पत्नी आणि दोन सुरक्षा कर्मचारी श्रीलंकेच्या हवाई दलाच्या विमानात बसून मालदीवची राजधानी माले येथे रवाना झाले. इमिग्रेशन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीलंकेच्या मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केलेल्या अँटोनोव्ह-32 लष्करी विमानात चार प्रवाशांमध्ये राजपक्षे, त्यांची पत्नी आणि दोन अंगरक्षक होते. माले येथील विमानतळाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, मालदीवमध्ये आल्यावर त्यांना पोलिस संरक्षणात अज्ञात ठिकाणी नेण्यात आले.Sri Lanka Crisis Sri Lankan President Gotabaya Rajapaksa flew out of the country on a military plane amid economic crisis and huge protests

प्रचंड दबावामुळे गोटाबाया राजपक्षे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे मान्य केले. पण रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, श्रीलंकेच्या संसदीय स्पीकरने सांगितले की राष्ट्रपतींचा राजीनामा अद्याप प्राप्त झालेला नाही. रॉयटर्सने मंगळवारी वृत्त दिले की, 20 जुलै रोजी संसदीय निवडणुका होतील तेव्हा श्रीलंकेचा मुख्य विरोधी पक्ष आपला नेता साजिथ प्रेमदासा यांना देशाचे पुढील अध्यक्ष म्हणून निवडेल.



राष्ट्राध्यक्ष या नात्याने राजपक्षे यांना अटकेतून सूट देण्यात आली असून, ताब्यात घेण्याची शक्यता टाळण्यासाठी त्यांनी देश सोडल्याचे मानले जाते. राजपक्षे यांनी देश सोडण्याचा आणखी एक प्रयत्न केला होता, परंतु नंतर त्यांना इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडून अडथळे आले. इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी व्हीआयपी सेवांमधून माघार घेतली आणि राष्ट्रपतींनी सार्वजनिक काउंटरमधून जाण्याचा आग्रह धरला, परंतु राजपक्षे यासाठी तयार नव्हते. त्यानंतर नेव्ही पेट्रोल क्राफ्टमध्ये बेट सोडण्याचा विचार केला.

शनिवारी (9 जुलै) हजारो आंदोलक राष्ट्रपतींच्या अधिकृत निवासस्थानात दाखल झाले, मात्र त्यापूर्वीच राजपक्षे निवासस्थानातून बाहेर पडले होते. तेव्हापासून त्याच्या स्थानाबाबत विविध अंदाज बांधले जात होते.

राजपक्षे यांना आज राजीनामा द्यावा लागणार

राष्ट्रपतींनी देश सोडल्याची बातमी अशा वेळी आली आहे, जेव्हा त्यांना त्यांच्या घोषणेनुसार आज (13 जुलै) राजीनामा द्यावा लागणार आहे. निदर्शक राष्ट्रपतींच्या निवासस्थानात घुसल्यानंतर राजपक्षे 13 जुलै रोजी राजीनामा देणार असल्याचे बोलले होते. आता राष्ट्रपतींनी देश सोडल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याबाबतही प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र, राजपक्षे यांनी राजीनामा पत्रावर स्वाक्षरी केल्याचा दावा मंगळवारी प्रसारमाध्यमांनी केला.

Sri Lanka Crisis Sri Lankan President Gotabaya Rajapaksa flew out of the country on a military plane amid economic crisis and huge protests

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात