वृत्तसंस्था
मुंबई : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील फरारी आर्थिक गुन्हेगार आणि हिरे व्यापारी नीरव मोदी याचा मेहुणा मयांक मेहता याने माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे विशेष न्यायालयाने त्याच्याविरोधातील वॉरंट रद्द केली. Special Court Cancels All Warrants Against Nirav Modis Brother In Law
विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. सी. बर्डे यांच्या समोर मेहता हा मंगळवारी हजर झाला. त्यानंतर त्याच्याविरोधातील सगळी वॉरंट रद्द केली. तसेच ५० हजार रुपयाच्या व्यक्तिगत मुचलका मंजूर केला. देशाबाहेर जायचे असल्यास न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल, अशी अटही घातली. त्याला मेहताच्या वकिलांनी विरोध केला.
अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) चौकशीसाठी बोलावण्यात आल्यावर तो हजर होईल. त्यामुळे या अटीची गरज नाही, असे मेहताच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.
भारतात पाऊल ठेवताच अटक होईल, अशी भीती मेहता दाम्पत्याने व्यक्त केली होती. पण, अटक केली जाणार नाही, अशी हमी दिल्यावर दोघेही भारतात यायला तयार झाले. परंतु त्यानंतर मयांक हा भारतात आला. त्याने ईडीसमोर जबाब देण्याची व तपासात सहकार्य करण्याची तयारी दाखवली.
नेमके झाले काय ?
मेहता आणि त्याची पत्नी हे पूर्वी आरोपी होते. मात्र नंतर माफीचा साक्षीदार बनण्याची तयारी दाखवली. सगळी अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्याची मागणी त्यांनी केली होती. फेब्रुवारी २०२१ मध्ये मेहता दाम्पत्याने वॉरंट रद्द करण्यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. त्यानंतरही न्यायालयाने वॉरंट रद्द केले नव्हते. एप्रिलमध्ये अजामीनपात्र वॉरंटचा निर्णयही प्रलंबित ठेवला होता. आता घोटाळ्याची माहिती देण्यासाठी त्यांना त्या दोघांना न्यायालयाने माफीचा साक्षीदार बनवण्यास परवानगी दिली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App