वृत्तसंस्था
चंदिगड : दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यात ज्याप्रकारे संघर्ष सुरू आहे, तशीच परिस्थिती आता पंजाबमध्ये निर्माण झाली आहे. पंजाबमधील आप सरकारचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि राज्यपाल बनवारीलाल पुरोहित आमनेसामने आले आहेत. सभागृहाबाहेर त्यांच्याबद्दल अशोभनीय टिप्पणी केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा पुरोहित यांनी मान यांना दिला आहे. भगवंत मान यांच्याविरोधात फौजदारी तक्रार दाखल करणार असल्याचे राज्यपालांनी सांगितले.Speak outside the House, Punjab Governor Purohit warned Chief Minister Bhagwant Mann
पुरोहित यांनी हिंदुस्तान टाइम्सला मुलाखत दिली. त्यामध्ये ते म्हणाले की, भगवंत मान यांनी सभागृहात माझ्याविरोधात अपशब्द वापरले. ते म्हणाले, ‘ते पत्र लिहित राहतात. मला वेळ कुठे आहे? हे सर्व काही ठीक नाही. मुख्यमंत्र्यांना सभागृहात काही प्रमाणात संरक्षण मिळते. त्यांनी हे सर्व सभागृहाबाहेर बोलू द्या. ज्या दिवशी ते असे करतील, आम्ही त्यांच्याविरुद्ध आयपीसी कलम 124 अंतर्गत गुन्हा दाखल करू. मान यांनी कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही ते म्हणाले. राज्यपालांना खूप अधिकार आहेत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपल्या जिभेची काळजी घ्यावी, विनाकारण शिवीगाळ करू नये, असे ते म्हणाले.
एक वर्षापासून सरकार आणि राज्यपाल यांच्यात वाद सुरू आहे. प्रशासकीय बाबींवर त्यांच्याकडून माहिती मागितली जाते तेव्हा ते त्याकडे दुर्लक्ष करतात, असे राज्यपाल म्हणाले होते. नुकतेच विधानसभेच्या दोन दिवसांच्या विशेष अधिवेशनात दोन विधेयके सभागृहात मंजूर करण्यात आली. यात राज्य विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या नियुक्तीचा अधिकार राज्यपालांकडून काढून घेण्याचे विधेयकही होते. राज्यपालांनी हे अधिवेशन असंवैधानिक म्हटलं होतं.
10-15 पत्रे लिहूनही उत्तर मिळाले नसल्याचे भगवंत मान म्हणाले होते. राज्यपाल म्हणाले की, भगवंत मान सरकार संविधानाच्या विरोधात काम करत आहे. भगवंत मान म्हणाले की, मी राजभवनाला नव्हे तर तीन कोटी पंजाबींना उत्तरदायी आहे. यावर राज्यपाल म्हणाले, तुम्हाला संविधानानुसार काम करावे लागेल. तुमही काय बादशहा आहात काय? भविष्यातही भगवंत मान यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही आणि माहिती दिली नाही, तर जे करायचे ते करू, असे राज्यपाल म्हणाले. सरकारच्या कामकाजाचा अहवाल राष्ट्रपतींना पाठवणार असल्याचे पुरोहित यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App