वृत्तसंस्था
माद्रिद : जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचा मान स्पेनच्या आजोबांना मिळाला आहे. त्यांचे वयोमान ११२ वर्षे २११ दिवस आहे. त्यांच्या या किर्तीमानाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. Spain grandfather is the older man of world’ ; Age 112 years 211 days
सॅटर्निनो डी ला फुएन्टे गार्सिया, असे त्या आजोबांचे नाव आहे. ज्यांचा जन्म १२ फेब्रुवारी १९०९ रोजी लिओन, स्पेन येथे झाला, त्यांना सर्वात वयस्कर व्यक्ती (पुरुष) म्हणून प्रमाणित करण्यात आले. त्यांना सात मुली आणि एक मुलगा होता.
पण, त्यांचे दुर्दैवाने लहानपणी निधन झाले. गार्सिया सध्या त्याची मुलगी, एंजेलिस आणि जावई बर्नार्डो यांच्यासोबत राहतात. आणि त्यांना १४ नातवंडे आणि २२ पतवंडे आहेत. दीर्घायुष्याचे रहस्य सांगताना ते म्हणाले, ‘शांत जीवन’ हे आहे. ‘शांत जीवन’ जगण्याबरोबर ‘कोणालाही दुखवले नाही’ हेच रहस्य आहे.
सॅटर्निनो त्यांची उंची ४.९२ फूट आहे. त्याच्या लहान उंचीमुळेच त्यांना १९३६ मध्ये सुरू झालेल्या स्पॅनिश गृहयुद्धात भाग घेता आला नाही. संघर्षाच्या वेळी ते पत्नी अँटोनिना बॅरियोसोबत शांतपणे जीवन जगत होतो. शूमेकर म्हणून आयुष्यभर नोकरी केली. तसेच लष्करासाठी बूट तयार करणे आणि त्याचा व्यवसाय वाढवून नाव कमावले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App