वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे अयोध्येत रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहतील की नाही हे अद्याप ठरलेले नाही. यासंदर्भात योग्य वेळ आल्यावरच पक्ष निर्णय घेईल. असे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी शुक्रवारी सांगितले. 22 जानेवारी 2024 रोजी रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. यामध्ये सोनिया आणि खरगे यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे.
नितीश आणि लालूंच्या उपस्थितीवरही संभ्रम
सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दावा केला आहे की, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि RJD प्रमुख लालू प्रसाद यादव देखील प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी आणि सीपीआय(एम) सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
येचुरी यांनी निमंत्रण नाकारले
सीताराम येचुरी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. ते Xच्या पोस्टमध्ये म्हणाले – धर्म ही वैयक्तिक निवड आहे, ज्याचा वापर राजकीय फायद्यासाठी केला जाऊ नये. सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे भाजप आणि आरएसएसने धार्मिक कार्यक्रम राज्य प्रायोजित केले.
निमंत्रण न मिळाल्याने उद्धव ठाकरे नाराज
शिवसेना यूबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण मिळालेले नाही. यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे. 22 जानेवारीच्या कार्यक्रमाला त्यांच्या पक्षाचा कोणताही नेता किंवा कार्यकर्ता जाणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. तर आपण सर्वजण नंतर अयोध्येला जाऊ असे ठाकरे म्हणालेत.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही अयोध्येला जाणार नसल्याची चर्चा आहे. तृणमूल काँग्रेसचा (टीएमसी) कोणताही नेता यात सहभागी होणार नाही. काही टीएमसी नेत्यांचे म्हणणे आहे की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला स्प्रिंगबोर्ड म्हणून वापरायचे आहे. मात्र, पक्षाकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही.
रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह 6000 दिग्गज सहभागी होणार आहेत. त्यांच्यामध्ये 4000 संत आणि सुमारे 2200 पाहुणे आहेत. या वेळी सहा दर्शनांचे शंकराचार्य आणि सुमारे दीडशे ऋषी-मुनीही उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात सुमारे 25 लाख लोक सहभागी होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App