
विशेष प्रतिनिधी
गोवा : तृणमूल काँग्रेससाठी गोवा दौर्यावर असणारे, निवडणूक रणनीतीकार म्हणून ओळखले जाणारे प्रशांत किशोर यांनी सध्याच्या राजकारणावर आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी आपली परखड मते भाजप आणि राहुल गांधी यांच्याबद्दल केलेली आहेत. गोव्यामधील एका कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी सध्याच्या राजकारणातील भाजपचे स्थान तसेच राहुल गांधी काँग्रेस यांच्या पुढील आव्हाने यावर भाष्य केले आहे.
‘So this is Rahul Gandhi’s problem …..’ – Prashant Kishor
आपले मत मांडताना ते म्हणतात, पुढील काही दशक भाजप राजकारणापासून सहजासहजी दूर होणार नाही. पण ही समस्या राहुल गांधी यांच्या बाबतची आहे. कारण राहुल गांधी यांचा असा समज आहे की, भाजपला जनता स्वतःहून दूर करेल. पण हे इतक्या सहजासहजी शक्य होणार नाही. जोपर्यंत तुम्ही भाजप सरकारचे सामर्थ्य काय आहे, हे समजून घेत नाही, ओळखत नाही तोपर्यंत त्यांना पराभूत करण्यासाठी तुम्ही कुठूनही सक्षम होणार नाही. असे मत प्रशांत किशोर यांनी व्यक्त केले आहे.
उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या घटनांबाबत राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी जी भूमिका घेतली त्यावरून असे दिसते की काँग्रेसचे पुनरुज्जीवन होत आहे. पण काँग्रेसच्या खोलवर रुजलेल्या समस्या आणि संघटनात्मक रचनेतील कमकुवत यावर त्वरित उपाय नाही. यावर खूप वर्ष काम करावे लागणार आहे. असे देखील त्यांनी काँग्रेसबद्दल आपले मत मांडताना म्हटले आहे.
‘So this is Rahul Gandhi’s problem …..’ – Prashant Kishor
महत्त्वाच्या बातम्या
- राज्याबाहेरील विद्यार्थ्यांना कन्नडसक्ती नको , कर्नाटक उच्च न्यायालयाचे मत
- कोरोना लसीकरणात मागास जिल्ह्यांमध्ये ‘हर घर दस्तक’ केंद्र सुरू होणार
- शर्लिन चोप्राने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्याकडून केली ७५ कोटींची मागणी , मानसिक छळाचा केला आरोप
- पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतायत; सोनारपूर नगरपालिका क्षेत्रात आजपासून तीन दिवसांचा लॉकडाऊन