कोरोनामुळे माता-पित्यांचे छत्र हरपलेल्या अनाथांची माहिती पोलीसांना द्या, असे कळकळीचे आवाहन केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृति इराणी यांनी केले आहे.अनाथ मुलांच्या योग्य पुनर्वसनासाठी एक विशेष मोहिमच हाती घेतली आहे.Smriti Irani’s campaign for orphans lost parents due to corona
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनामुळे माता-पित्यांचे छत्र हरपलेल्या अनाथांची माहिती पोलीसांना द्या, असे कळकळीचे आवाहन केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृति इराणी यांनी केले आहे.अनाथ मुलांच्या योग्य पुनर्वसनासाठी एक विशेष मोहिमच हाती घेतली आहे.
कोरोनामुळे अनाथ झालेल्या या मुलांच्या पुढील पालनपोषणाचा प्रश्न निर्माण झाला असून त्यांची बेकायदेशीररित्या दत्तक प्रक्रियाही सुरू झाल्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत.
त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती ईराणी यांनी आवाहन केले आहे की, कोरोनामुळे अनाथ झालेली मुले तसेच त्यांची काळजी घेण्यासाठी कुटुंबातील जवळचे कुणी नसेल तर त्या मुलांबाबत पोलिसांना माहिती द्या.
कोरोना महामारीत अनेक कुटुंबे बळी ठरली आहेत. काही कुटुंबांमध्ये कर्ता पुरुष व पत्नीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. अशा परिस्थितीत त्या दाम्पत्यांची मुले अनाथ झाली आहेत. त्यांच्या जबाबदारीचा, पालनपोषणाचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
याबाबत इराणी यांनी म्हटले आहे की, जर तुम्हाला कोविड-19 मुळे आई-वडिल गमवावे लागलेल्या मुलांची माहिती कळली, तसेच त्या मुलांची देखभाल करणारे कुणी नसेल, तर तुम्ही आपल्या जिल्ह्याच्या पोलिसांना किंवा बालकल्याण समितीला कळवा. याशिवाय तुम्ही चाईल्ड लाईन 1098 या क्रमांकावरही संपर्क साधू शकता. ही तुमची कायदेशीर जबाबदारी आहे.
महत्त्वाची बातमी
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App