High Court : मद्रास उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने नुकतेच व्हर्च्युअल सुनावणीसाठी उपस्थित असलेल्या एका वकिलाला आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यानंतर प्रकरण चांगलेच तापले आहे. हायकोर्टाने आता वकिलाविरुद्ध अवमानाची कारवाई सुरू केली आहे. न्यायमूर्ती इलांथिरैया यांच्या न्यायालयीन कामकाजादरम्यान ही घटना घडली. Shocking During the hearing in the High Court, the lawyer seen in an obscene situation with woman, Suspended by Bar Council
वृत्तसंस्था
चेन्नई : मद्रास उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने नुकतेच व्हर्च्युअल सुनावणीसाठी उपस्थित असलेल्या एका वकिलाला आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यानंतर प्रकरण चांगलेच तापले आहे. हायकोर्टाने आता वकिलाविरुद्ध अवमानाची कारवाई सुरू केली आहे. न्यायमूर्ती इलांथिरैया यांच्या न्यायालयीन कामकाजादरम्यान ही घटना घडली.
धक्कादायक बाब म्हणजे आभासी सुनावणीद्वारे उपस्थित वकील एका महिलेशी आक्षेपार्ह वर्तन करत होता. हा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर न्यायमूर्ती प्रकाश आणि हेमलता यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची स्वत:हून दखल घेत न्यायालयीन कार्यवाही सुरू केले.
मद्रास उच्च न्यायालयानेही या प्रकरणाची सीबीसीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिले कारण हा आयटी कायद्यानुसार गुन्हा आहे. न्यायाधीशांनी तमिळनाडू बार कौन्सिलला वकिलाविरुद्ध योग्य ती शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देशही दिले. यानंतर बार कौन्सिलने या वकिलाला कोणत्याही न्यायालयात प्रॅक्टिस करण्यापासून निलंबित केले आहे.
सोमवारी एक न्यायाधीश व्हिडिओ-कॉन्फरन्सिंगद्वारे या प्रकरणाची सुनावणी करत असताना, आभासी सुनावणीत उपस्थित वकील कथितपणे एका महिलेसोबत अश्लील स्थितीत दिसला आहे. मंगळवारी हा व्हिडिओ व्हायरल झाला.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, “जेव्हा न्यायालयीन कामकाजादरम्यान अशी निर्लज्ज अश्लीलता सार्वजनिकपणे प्रदर्शित केली जाते, तेव्हा न्यायालयाला मूक प्रेक्षक बनून राहणे आणि डोळे मिटणे परवडणारे नाही.” यासह, उच्च न्यायालयाने शहर पोलिस आयुक्तांना सोशल मीडियावरील वादग्रस्त व्हिडिओ क्लिपिंगचा प्रसार रोखण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.
Shocking During the hearing in the High Court, the lawyer seen in an obscene situation with woman, Suspended by Bar Council
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App