एका ओव्हरमध्ये ३ नो बॉल!
विशेष प्रतिनिधी
सना जावेदसोबत तिसरे लग्न करणारा पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक सध्या अडचणीत सापडला आहे. बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये खेळणाऱ्या मलिकचा करार त्याच्या संघाने संपुष्टात आणला आहे. मलिकवर मॅच फिक्सिंगचा आरोप आहे.Shoaib Malik caught in match fixing case cricket contract ends
शोएब मलिक नुकताच बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये (बीपीएल) खेळताना दिसला. शोएब बीपीएलमध्ये फॉर्च्युन बरीशालकडून खेळत होता. 22 जानेवारी रोजी मीरपूरमध्ये खुल्ना टायगर्सविरुद्धच्या सामन्यात त्याने एकापाठोपाठ एक सलग तीन नो बॉल टाकले. यानंतर तो सोशल मीडियावर अनेक पाकिस्तानी आणि क्रिकेट चाहत्यांचा निशाणा बनला.
बांगलादेश प्रीमियर लीगची फ्रँचायझी फॉर्च्यून बरीशालने शोएब मलिकचा शेवटच्या सामन्यात फिक्सिंग केल्याच्या संशयावरून त्याचा करार रद्द केला आहे. खुल्ना रायडर्सविरुद्ध शोएब मलिकने एकाच षटकात तीन नो बॉल टाकले होते, त्यानंतर शंका निर्माण झाली होती. मलिकने तीन वेळा लाईन ओलांडली. यानंतर संघ मालकांनी त्याचा करार संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यादरम्यान मलिकने सहा चेंडूत केवळ पाच धावा केल्या. फॉर्च्युन बरीशाल संघाचे मालक मिझानुर रहमान यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App