भारतीय विद्यार्थ्यांना पोलंडची मदत : शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी – पोलंडचे राजदूत ॲडम बुराकोवस्की यांच्या ट्विटर वॉर!!

प्रतिनिधी

नवी दिल्ली : रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी आणि पोलंडचे भारतातील राजपूत ॲडम बुराकोवस्की यांच्यात जोरदार ट्विटर वॉर रंगले आहे.Shiv Sena MP Priyanka Chaturvedi – Twitter war between Polish Ambassador Adam Burakowski

पोलंड भारतीय विद्यार्थ्यांना मदत करत नाही असा आरोप करणारे ट्विट प्रियंका चतुर्वेदी यांनी केले होते. त्याला ॲडम बुराकोवस्की यांनी आकड्यासहित प्रत्युत्तर दिले. पोलंडने तीन लाख शरणार्थींना स्वीकारले आहे. त्यामध्ये 1200 भारतीय विद्यार्थी आहेत, असे ट्विट त्यांनी केले. पण त्याचबरोबर मॅडम आपण फेक न्यूज पसरवू नका, अशी शेरेबाजी त्यांनी केली. आपण आपला खाजगी नंबर शेअर करू शकत नाही असेही पोलंडच्या राजदूताने म्हटले.

 

त्यावर प्रियंका चतुर्वेदी भडकल्या आणि त्यांनी ट्विट करत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी टॅग केले. आपण फेक न्यूज पसरवत नसून आपल्यापर्यंत आलेल्या तक्रारीत पोचवत होतो. मी परराष्ट्र मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची सदस्य आहे. पोलंडच्या राजदूतांनी माझ्यावर फेक न्यूज पसरवण्याचा आरोप केला आहे. आपल्या देशात अनेक देशांचे राजदूत वास करतात पण असा आरोप कोणी आतापर्यंत केला नाही, याची दखल घेतली पाहिजे, असे प्रियंका चतुर्वेदी यांनी आपल्या ट्विटमध्ये नंतर म्हटले आहे.

यातली वास्तविकता अशी की : पोलंडने 1200 भारतीय विद्यार्थ्यांना आपल्या हद्दीत आश्रय दिला आहे. त्यांची व्यवस्था करण्यात येत आहे. आणखी विद्यार्थी आले तर ते स्वीकारण्याची पोलंडची तयारी आहे. याबाबत राजदूत ॲडम बुराकोवस्की यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात गुजरात मधल्या जामनगरच्या महाराजांनी केलेल्या मदतीची आठवण करून दिली आहे. सोवियत युनियनने पोलंडवर आक्रमण केल्यानंतर तेथे 1100 पोलीश अधिकाऱ्यांना जामनगरच्या महाराजांनी आश्रय दिला होता. ही ती आठवण आहे. मात्र, या मुद्द्यावरून प्रियांका चतुर्वेदी आणि पोलंडच्या राजदूतांमध्ये ट्विटर वॉर रंगले आहे.

आनंद रंगनाथन यांनी एक ट्विट करून पोलंड मधल्या शरणार्थी शिबिराचे एक छायाचित्र त्यात समाविष्ट केले आहे. भारतीय विद्यार्थ्यांना या शिबिरात मदत करण्यात येत आहे.

Shiv Sena MP Priyanka Chaturvedi – Twitter war between Polish Ambassador Adam Burakowski

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात