ED action : ईडीची ॲक्शन, मंत्री “गायब” होण्याची रिॲक्शन…!! “शास्त्र असतेय ते”…!!


सध्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे मंत्री असले तरी प्रत्यक्षात काही मंत्र्यांनी आपली पार्टी बदलली असून ते भाडिपा अर्थात भारतीय डिजिटल पार्टीमध्ये गेल्याचे लक्षात येत आहे…!! भाडिपाने “शास्त्र असतेय ते” हे जे तंत्र विकसित केले आहे, त्यानुसार ईडीची ॲक्शन झाल्याबरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादीत रिअँक्शन होऊन ते मंत्री गायब झालेले आढळतात…!! ED action: ED’s action, reaction to the minister’s “disappearance” … !! “There is science” … !!

सुरुवात संजय राठोडांकडून!!

याची सुरुवात शिवसेनेच्या संजय राठोड यांनी केली. टिक टॉक स्टार पूजा चव्हाण यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर संशयाची सुई शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांच्या दिशेने झाली आणि त्याक्षणी ते “गायब” झाले. त्यांची कार मंत्रालयाच्या पार्किंग एरियात आढळली. पण ते मात्र नेमके कोठे आहेत हे कुणाला दिसले नाही. नंतर ते यवतमाळमध्ये स्वतःच्या बंगल्यात असल्याचे समजले. प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी तिथे पोहोचले तेव्हा यवतमाळच्या त्यांच्या प्रशस्त बंगल्यात शुकशुकाट असल्याचे आढळले. त्यांच्या बंगल्यातल्या आवारातील गाडी सुरुवातीला नव्हती. नंतर ती गाडी “अचानक” दिसायला लागली. त्यामुळे संजय राठोड हे यवतमाळच्या बंगल्यात असल्याचेच सांगण्यात आले, पण तरी देखील ते कोणाला ही दिसले नाहीत. माध्यमांचे कॅमेरे खिडक्या – खिडक्यांमधून डोकावले. पण संजय राठोड गायब ते गायबच…!! शिवसेना नेत्यांनी म्हणे किंवा त्यांना प्रसार माध्यमांसमोर यायला “बंदी” घातली होती. 15 फेब्रुवारी 2021 नंतर गायब झालेले संजय राठोड नंतर ते मार्च 2021 च्या पहिल्या आठवड्यात मुंबईला परतले. दरम्यानच्या काळात ते आपल्या कुलदेवतेला ही जाऊन आले. मुंबईत परतल्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला म्हणजे द्यावा लागला आणि त्यानंतर ते एकदाच माध्यमांसमोर “प्रकटले”.



 अनिल देशमुखही असेच “गायब”!!

संजय राठोड यांचे अनुकरण 100 कोटींच्या खंडणी प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. त्यांच्या नागपूर, काटोल आणि मुंबई इथल्या घरांवर ईडीचे अधिकारी छापे घालत होते. पण स्वतः अनिल देशमुख “गायब” होते. ते नेमके कुठे होते? हे राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही “माहिती” नव्हते. घरच्यांनाही त्यांचा पत्ता नव्हता. 8 दिवस असा पाठशिवणीचा खेळ केल्यानंतर अनिल देशमुख अखेर मुंबईत ईडीच्या कार्यालयात शरण गेले.

 प्राजक्त तनपुरे यांचा नंबर

…आणि आता राष्ट्रवादीचे तिसरे मंत्री प्राजक्त तनपुरे असेच “गायब” झाले आहेत. त्यांच्या राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखान्याचे 13 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. प्राजक्त तनपुरे यांची 7 कोटी रुपयांची जमीन देखील जप्त केली आहे. त्यांच्याच बरोबर काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनाही ईडीच्या कारवाईचा फटका बसला आहे आणि आता प्राजक्त तनपुरे हे नॉट रिचेबल झाले आहेत.

संजय राठोड आणि अनिल देशमुख हे देखील सुरुवातीला असेच नॉट रिचेबल झाले होते. नंतर ते “गायब” झाल्याच्या बातम्या आल्या आणि त्यानंतर त्यांच्या शरणागतीच्या बातम्या आल्या. आता प्राजक्त तनपुरे नॉट रिचेबल झाले आहेत यानंतर यांची शरणागतीची बातमी येते की त्यांच्या अटकेची बातमी येते हे पाहणे महत्त्वाचे आहे… पण या निमित्ताने एक गोष्ट “सिद्ध” झाली ती म्हणजे ईडीची ऍक्शन झाली रे झाली की भाडिपाच्या “शास्त्र असतेय ते”ची रिॲक्शन सुरू होते आणि मंत्री “गायब” होतात…!! शिवसेना विशेषतः साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस या शास्त्रात फार तरबेज आहे.

ED action: ED’s action, reaction to the minister’s “disappearance” … !! “There is science” … !!

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात