शशी थरूर यांनी पुन्हा केले पंतप्रधान मोदींचे कौतुक; मुस्लिम देशांसोबतचे संबंध एवढे कधीही चांगले नव्हते

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरूर यांनी सोमवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, सुरुवातीला मी परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. पण आता मला वाटते की त्यांनी सर्व आघाड्यांवर चांगले काम केले आहे. मुस्लिम देशांसोबतचे आमचे संबंध आजच्यापेक्षा कधीही चांगले नव्हते.Shashi Tharoor again praises PM Modi; Relations with Muslim countries have never been better

याआधी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी थरूर यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले होते. काँग्रेसच्या एका पोस्टवर त्यांनी प्रतिक्रिया दिली होती. काँग्रेसने ट्विटरवर माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचा शीर्षासनाचा फोटो पोस्ट केला होता. त्यांनी लिहिले, ‘पंडित नेहरूंना धन्यवाद, ज्यांनी योग लोकप्रिय केला आणि त्याला राष्ट्रीय धोरणाचा भाग बनवले.’


केरळला पीएम मोदींनी दिलेल्या या भेटीमुळे शशी थरूर झाले आनंदी, म्हणाले- राजकारणाच्या पलीकडे जाऊन असा व्हावा विकास


यावर त्यांनी रिट्विट केले आणि लिहिले की, ‘नक्कीच, आम्ही आमच्या सरकारचे तसेच ज्यांनी योग पुनरुज्जीवित आणि लोकप्रिय केला त्यांचे आभार मानले पाहिजेत. त्यांनी PMO, MEAINDIA ला टॅग केले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून योग दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर नेल्याचे त्यांनी सांगितले.

G20 ला चर्चेचा मुद्दा बनवल्याबद्दल मोदींचे कौतुक

थरूर म्हणाले की, मला आठवते, मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्याच वर्षी त्यांनी 27 देशांना भेटी दिल्या. त्यापैकी एकही इस्लामिक देश नव्हता. काँग्रेसचा खासदार म्हणून मीही यावर टीका केली होती.

आता मला हे सांगायला आनंद होत आहे की त्यांनी इस्लामिक जगतापर्यंत पोहोचण्यासाठी जे केले ते अनुकरणीय आहे. खरोखर यापेक्षा चांगले होऊ शकत नाही. प्रमुख मुस्लिम देशांशी आमचे संबंध कधीही चांगले राहिले नाहीत. माझी सुरुवातीची टीका मागे घेताना मला आनंद होत असल्याचे थरूर म्हणाले.

G20 ला चर्चेचा विषय बनवल्याबद्दल त्यांनी मोदी सरकारचे कौतुकही केले. ते म्हणाले, जी-20 मध्ये भारताने चमकदार कामगिरी केली. जगाला आता भारताकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

चायनीज अॅप्सवरील बंदी ही केवळ लबाडी होती

थरूर यांनी चीनबाबत केंद्र सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, सरकारने चीनला भारतावर अतिक्रमण करण्यास मोकळा हात दिला आहे. चीनसोबतचे आमचे संबंध चव्हाट्यावर आले आहेत. चीनच्या धोरणाबाबत सरकारकडून कोणतीही स्पष्टता नाही. संसदेत चीनवर चर्चा होत नाही. चायनीज अॅप्सवरील बंदी ही केवळ लबाडी होती.

भाजपने म्हटले- थरूर यांनी कदाचित दुर्बलतेच्या क्षणी खरे बोलले असावे

थरूर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भारतीय जनता पक्षाचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले की, शशी थरूर, कदाचित दुर्बलतेच्या क्षणी खरे बोलले आहेत.

Shashi Tharoor again praises PM Modi; Relations with Muslim countries have never been better

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात