प्रतिनिधी
पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा मेट्रोच्या उद्घाटनापेक्षा राजकीय वादांनी गाजवायचे काँग्रेसने ठरविलेच आहे, त्यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भर घालायचे ठरविले आहे.sharad pawar targets PM narendra modi over pune metro inauguration program
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यात मेट्रोचे उद्घाटन आणि मेट्रोतून प्रवास करणार आहेत. त्यावरून शरद पवारांनी मोदींच्या दिशेने टोलेबाजी केली आहे. मेट्रोचे काम पूर्ण झालेले नाही. मध्यंतरी अधिकाऱ्यांनी मला मेट्रोचे काम बघायला बोलावले होते. तेव्हा मी मेट्रोतून प्रवास केला. काही ठिकाणी काम पूर्ण झाले नसल्याचे माझ्या लक्षात आले. तरीही पंतप्रधान मोदी हे मेट्रोचे उद्घाटन करणार आहेत. पण मला त्याबद्दल काही तक्रार करायची नाही. पंतप्रधानांच्या कार्यक्रमाबद्दलही मला काही तक्रार करायची नाही, अशी टोलेबाजी पवारांनी केली आहे.
पंतप्रधान मोदी हे मेट्रोच्या उद्घाटनानंतर गरवारे कॉलेज ते आनंदनगर असा मेट्रोचा प्रवास देखील करणार आहेत.
त्याच बरोबर नदी सुधार कार्यक्रमाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी करणार आहेत. त्यावर देखील पवारांनी खोचक टिपण्णी केली आहे. नदी सुधार योजना ते राबविणार आहेत. ते नदीच्या भोवती सुधारणा जास्त करतात. पण नदीचे पात्र अरुंद झाले आणि उद्या काही दुर्घटना झाली तर नदीकाठच्या गावांची मला चिंता वाटते. कारण मुठा नदीवर किती धरणे आहेत, हे मला माहिती आहे, असे पवार म्हणाले. पण ज्या अर्थी पंतप्रधान मोदी नदी सुधार योजनेचे भूमिपूजन करणार आहेत, त्या अर्थी त्यांनी त्याचा पूर्ण अभ्यास केला असणार, अशी शेरेबाजी पवारांनी केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App