प्रतिनिधी
पुणे – उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसने स्टार प्रचारकांची ४० जणांची भली मोठी यादी जाहीर केली होती. उत्तर प्रदेशात घड्याळ या चिन्हावर उमेदवार उभे केल्याचे देखील सांगितले होते. मात्र, सात टप्प्यातला प्रचार संपूर्णपणे पार पडला, तरी राष्ट्रवादीचा एकही स्टार प्रचारक उत्तर प्रदेशाकडे फिरकलेला दिसला नाही.NCP’s star campaigners have not even turned to Uttar Pradesh
मात्र, आज पुण्याच्या पत्रकार परिषदेत उत्तर प्रदेशासह ५ राज्यांच्या विधानसभा निवडणूकीच्या निकालाबाबत प्रश्न विचारल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी निकालाबाबत भाष्य करायला ज्योतिषाचा आधार घ्यावा लागण्याइतपत माझी अवस्था आलेली नाही, असा टोला लगावला. पवारांनी हा टोला भाजपला मारल्याचा निष्कर्ष मराठी माध्यमांनी काढला.
उत्तर प्रदेश आणि गोव्यात राष्ट्रवादीने उमेदवार उभे केल्याचे सांगण्यात आले. पण राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक खासदार शरद पवार, प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे हे कोणी दोन्ही दोन्ही राज्यांमध्ये फिरकल्याचे दिसले नाही. तरी देखील पुण्याच्या पत्रकार परिषदेत पवारांना ५ राज्यातील निवडणूक निकालावर भाष्य करण्यास सांगण्यात आले तेव्हा त्यांनी ज्योतिषाचा आधार घेण्याची गरज नसल्याचा टोला हाणला.
मात्र, या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीने उत्तर प्रदेशात नेमके किती उमेदवार उभे केले होते… राष्ट्रवादीने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर करूनही एकही स्टार प्रचारक उत्तर प्रदेश किंवा गोवा या राज्यांमध्ये फिरकला का नाही… वगैरे प्रश्न पत्रकारांनी विचारले नाहीत. त्यामुळे पवारांनी त्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. उलट ५ राज्यातील निवडणूक निकालाबाबत भाष्य करायला मला ज्योतिषाची गरज नाही, असा टोला हाणून घेतला. तेव्हा हा टोला पवारांनी भाजपला मारल्याचा निष्कर्ष मराठी माध्यमांनी परस्पर काढून घेतला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App