वृत्तसंस्था
नवी दिल्ली : फलटण आणि साताऱ्यातल्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना 5 मिनिटे भेटून आले. स्वतः पवारांनीच ही माहिती पत्रकारांना दिली. महाराष्ट्रातल्या राजकारणा संदर्भात कुठलीही त्यांच्याशी चर्चा झाली नाही, असे पवारांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्ण धुव्वा उडाल्यानंतर पहिल्यांदाच पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेल्याने महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होण्याच्या अटकळी मराठी माध्यमांनी बांधल्या होत्या. पवार भाजपच्या गोटात येणार किंवा आपले आमदार भाजपच्या सत्तेच्या वळचणीला नेऊन बांधणार अशा चर्चा माध्यमांनी रंगविल्या होत्या.
Chhagan Bhujbal छगन भुजबळ म्हणाले- राष्ट्रवादीत अजितदादा, प्रफुल्ल पटेल, तटकरे हे तिघेच निर्णय घेतात, पूर्वी मला ठाकरे-पवार विश्वासात घ्यायचे
प्रत्यक्षात शरद पवार हे फलटण आणि साताऱ्या मधले डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना घेऊन संसदेतल्या पंतप्रधान कार्यालयात पोहोचले. तिथे त्यांनी 5 मिनिटे पंतप्रधान मोदींची भेट घेतली. डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी काही डाळिंबे पंतप्रधानांना भेट दिली आणि आपल्या कामासंदर्भात माहिती दिली. फक्त 5 मिनिटांची ही भेट होती, असे नंतर पवारांनी पत्रकारांना सांगितले. त्यात महाराष्ट्राच्या राजकारणाविषयीची कुठलीही चर्चा झाली नसल्याचा खुलासा त्यांनी केला.
पण पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला पोहोचले आणि त्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर चर्चा झाली नाही, यावर कुठल्याच माध्यमांचा विश्वास बसला नाही. त्यामुळे माध्यमांनी महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या भूकंपाविषयीची चर्चा सुरू ठेवली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App