Shane Warne : फिरकीच्या जादूगाराची झळाळती कारकीर्द…!!

वृत्तसंस्था

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू लेग स्पिनर शेन वॉर्नचे वयाच्या 52 व्या वर्षी अचानक निधन झाले. शेन वॉर्नच्या मृत्यूमुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. वॉर्नच्या मृत्यूमुळे फिरकीचा जादूगार हरपल्याची भावना क्रिकेट विश्वातून व्यक्त होत आहे. Shane Warne: Sparkling Wizard’s illustrious career

– शेन वॉर्नची कसोटी कामगिरी

शेन वॉर्नने 145 कसोटी आणि 194 एकदिवसीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले. वॉर्नने 145 कसोटी सामन्यांमध्ये 708 विकेट्स घेतल्या होत्या. वॉर्नने 37 वेळा 5 विकेट्स तर 10 वेळा 10 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. एका कसोटी सामन्यात 128 धावा देऊन 12 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.

– वन डे कामगिरी

194 वन डे मॅचमध्ये त्याने 293 बळी घेतले होते. वॉर्नची वनडेमधील 33 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स ही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी होती.

– आयपीएलमधील कामगिरी

शेन वॉर्नने आपल्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सला आयपीएलचे पहिले विजेतेपद मिळवून दिले होते. वॉर्न आयपीएलमध्ये 55 मॅचमध्ये 57 विकेट्स घेतल्या होत्या.


Shane Warne: Sparkling Wizard’s illustrious career

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात