भागलपूर येथे शक्तिशाली स्फोटात सात जण ठार

विशेष प्रतिनिधी

पाटणा : बिहारमधील भागलपूर येथे झालेल्या शक्तिशाली स्फोटात सात जण ठार झाले. गुरुवारी रात्री हा स्फोट झाला. त्यामुळे तीन मजली इमारत जमीनदोस्त झाली. जवळपासच्या इतर अनेक घरांचे नुकसान झाले आहे. या घरात बॉम्ब बनवण्यात येत असल्याचे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे. पीडित कुटुंब फटाके बनविण्याचा व्यवसाय करत असल्याचेही सांगण्यात आले आहे. Seven killed in Bhagalpur blast

एएनआयच्या वृत्तानुसार, सात जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. तातारपूर पोलीस स्टेशन परिसरात हा स्फोट झाला. भागलपूरचे जिल्हाधिकारी सुब्रत कुमार सेन यांनी सांगितले की, स्फोटामुळे दोन घरांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. ही घटना काजवलीचक परिसरातील अनाथाश्रमाजवळ घडली.



या अपघातात १२ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. ज्या घरात स्फोट झाला ते घर कोतवालीपासून अवघ्या १०० मीटर अंतरावर आहे. भागलपूरचे डीआयजी सुजित कुमार म्हणाले, “प्राथमिक तपासात बेकायदेशीर फटाके आणि गनपावडर, स्फोटासह देशी बनावटीचे बॉम्ब असल्याची चर्चा आहे. एफएसएल टीमच्या तपासानंतर हा स्फोट कशामुळे झाला हे ठरवले जाईल. ”

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता फटाके बनविणाऱ्याच्या घरी ही घटना घडली. स्फोट एवढा शक्तिशाली होता की दोन मजली घर उडाले. घटनास्थळापासून चार किलोमीटरच्या परिघात येणाऱ्या घरात असलेल्या लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले यावरून स्फोटाची तीव्रता मोजता येते. स्फोटानंतर संपूर्ण परिसरात मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे पोलीस बंदोबस्त तैनात करून परिस्थिती हाताळावी लागली.

ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले आणि त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशासनाच्या पथकाने जेसीबी घरातून व आजूबाजूच्या इमारतींवरील ढिगारा हटवला.

Seven killed in Bhagalpur blast

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात