विशेष प्रतिनिधी
लखनौ : मेरठमधील मोदीपुरमच्या दुल्हिदा गावातून पल्लवपुरमच्या क्यू पॉकेटच्या ७२ क्रमांकाच्या घरात शुक्रवारी सकाळी बिबट्याने प्रवेश केला. त्यामुळे कुटुंबात खळबळ उडाली होती. गेल्या एक तासापासून हे कुटुंब खोलीत कैद आहे. माहिती मिळताच पोलिस आणि जमाव जमा झाला. Panic as leopards enter the house
घरमालक स्वप्नील यांनी सांगितले की, मोठा आवाज ऐकून त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिले असता त्यांना बिबट्या दिसला. यानंतर पोलिसांनी त्यांना बाहेर येण्यास मनाई केली. त्यांच्याशिवाय त्यांची पत्नी प्रीती शर्मा, आई आभा शर्मा, वहिनी आणि दोन मुले घरात बंद आहेत.
पोलिसांनी या प्रकरणाची माहिती वनविभागाला दिली आहे. तासाभरानंतरही पथक घटनास्थळी पोहोचले नाही. बिबट्या पहिल्यांदा पळताना डॉक्टर राजकुमार चौधरी यांना दिसला. त्याचा आवाज ऐकून गर्दी जमली आणि बिबट्या स्वप्नीलच्या घरात घुसला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App