घोटाळ्यातील ७० कोटी रुपये घेतले असल्याचा दावा
विशेष प्रतिनिधी
मुंबई : bank scam १२२ कोटी रुपयांच्या न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) आणखी एका आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात, आर्थिक गुन्हे शाखेने डेव्हलपरला अटक केली असून त्याचे नाव धर्मेश पौण असल्याचे सांगितले जात आहे.bank scam
या प्रकरणात झालेल्या १२२ कोटी रुपयांपैकी धर्मेशने ७० कोटी रुपये घेतल्याचे तपासात उघड झाले. आर्थिक गुन्हे शाखेने सांगितले की, धर्मेशला मे आणि डिसेंबर २०२४ मध्ये १.७५ कोटी रुपये आणि जानेवारी २०२५ मध्ये ५० लाख रुपये मुख्य आरोपी जनरल मॅनेजर हितेश मेहता यांच्याकडून मिळाले.
या प्रकरणात, काल पोलिसांनी चौकशीनंतर हितेश मेहताला अटक केली. दोन्ही आरोपींना हजर करण्यासाठी मुंबईच्या किल्ला न्यायालयात आणण्यात आले आहे. न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे माजी महाव्यवस्थापक हितेश प्रवीणचंद मेहता यांनी दादर आणि गोरेगाव शाखांचे प्रभारी असताना त्यांच्या पदाचा गैरवापर करून दोन्ही शाखांच्या खात्यांमधून १२२ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला होता.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हितेश मेहता एका शाखेतून दुसऱ्या शाखेत पैसे ट्रान्सफर करताना चोरी करायचा. पैसे ट्रान्सफर करताना हितेश गाडीतून पैसे काढून घरी घेऊन जायचा. आरोपी हितेश मेहता याने प्रभादेवी शाखेतून ११२ कोटी रुपये आणि गोरेगाव शाखेतून १० कोटी रुपये चोरीले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App