वृत्तसंस्था
नवी दिल्ली : तब्बल १३ हजार ५०० कोटींचा पीएनजी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी फरार होऊन लंडनमध्ये स्थायिक होता, आता लंडनमधील उच्च न्यायालयाने जो महत्वाचा निकाल दिला आहे, हे पाहता नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. Scammer will bring Nirav Modi to India
लंडनमध्ये फरार होता
हिरे व्यापारी नीरव मोदी याला ताब्यात देण्यात यावे, याकरता भारत सरकारने लंडन येथील उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान लंडन न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे नीरव मोदीच्या मुसक्या आवळून त्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
खरंतर फेब्रुवारी महिन्यातच नीरव मोदीला भारताच्या ताब्यात देण्यासंदर्भात वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाने निर्णय दिला होता. तेव्हापासून नीरव मोदी वँड्सवर्थ तुरुंगात होता. मात्र, त्याने या निर्णयाला आव्हान देणारी याचिका लंडन न्यायालयात दाखल केली होती. आपले मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्याचा दावा ५१ वर्षीय मोदीने याचिकेत केला होता. त्याच आधारावर आपल्याला भारतात पाठवू नये, अशी मागणी त्याने केली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App