गुजरातमधील सिंह नोव्हेंबर अखेरीस संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येणार; सुधीर मुनगंटीवारांच्या प्रयत्नांना यश

प्रतिनिधी

मुंबई : गुजरात मधील सक्करबाग येथील सिंहाची जोडी नोव्हेंबर अखेरीस मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल होणार आहे. दि. 26 सप्टेंबर रोजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या गुजरात दौऱ्याच्या वेळी गुजरातचे वन राज्यमंत्री जगदीश विश्वकर्मा यांच्याशी याविषयी चर्चा झाली होती. त्यावेळी गुजरातमधील सिंहाची जोडी मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाठविण्याबाबत एकमत झाले होते. Lions from Gujarat will arrive in Sanjay Gandhi National Park by the end of November; Success to Sudhir Mungantiwar’s efforts

केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकारणाच्या परवानगीसाठी हा विषय थांबला होता. आता ही परवानगी मिळाल्याने गुजरात येथील सक्करबाग प्राणी संग्रहालयातील आशियायी सिंहाची जोडी (एक नर व एक मादी ) आता नोव्हेम्बर अखेरीस मुंबईत दाखल होणार आहे.



संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली येथे 12 हेक्टर कुंपण क्षेत्रात क्षेत्रात 1975 – 1976 मध्ये सिंह सफारी सुरू करण्यात आली होती. सिंह सफारी मुळे उद्यानाच्या महसुलात वाढदेखील झाली होती. परंतु केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने सिंहाचे प्रजनन करण्यास मनाई केल्याने येथील सिंहाची संख्या कमी झाली. गेल्या महिन्यात 17 वर्षे वयाच्या सिंहाचा मृत्यू झाल्याने उद्यानात एकच नर सिंह शिल्लक राहिला आहे.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे गुजरात राज्यातील ही सिंहाची जोडी येणार असल्याने उद्यानात पर्यटकांची संख्या पुन्हा वाढणार आहे.

Lions from Gujarat will arrive in Sanjay Gandhi National Park by the end of November; Success to Sudhir Mungantiwar’s efforts

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात