विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय स्टेट बँक (एसबीआय) च्या ग्राहकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न चीनी हॅकर्सकडून होत आहे. केवायसी अद्ययावत करण्याच्या नावाखाली हे हॅकर्स व्हॉटसअॅपवरून संकेतस्थळ पाठवित आहे. बॅँकेकडून ५० लाख रुपयांची भेटवस्तू मिळणा असल्याचे आमिष दाखवून लुबाडणूक होत आहे.SBI customers, fraud is being perpetrated by Chinese hackers under the guise of KYC
नवी दिल्ली येथील थिंक टँक सायबरपीस फाऊंडेशनच्या रिसर्च शाखेने ऑटोबॉट इन्फोसेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासह केलेल्या अभ्यासात हे उघड झाले आहे. स्मार्टफोनचा वापर करणाऱ्यां च्या फसवणुकीच्या दोन घटना समोर आले आहेत. फसवणूक करणाऱ्यां ची सर्व डोमेन नावे चीन म्हणून नोंदणीकृत देश आहेत,असे संशोधन पथकाने सांगितले.
सुरूवातीला बॅँकेच्य नावाने केवायसी पडताळणीची विनंती करणारा टेक्स्ट मेसेज पाठविला जातो. त्यानंतर दिसणारे पेज हे एसबीआयच्या ऑनलाईन पेजसारखेच दिसते. लॉग इन सुरू ठेवा या बटणावर क्लिक केल्यावर, वापरकर्त्यास ऑनलाईन बँकिंगमध्ये लॉग इन करण्यासाठी यूजरनेम आणि पासवर्ड मागितला जातो.
त्यानंतर यूजरच्या मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर मागितला जातो. ओटीपी एंटर केल्यावर यूजरला दुसऱ्या पेजवर आपोआप नेले जाते. तेथेही पुन्हा अकाऊंट होल्डरचे नाव, मोबाईल नंबर, डेट आॅफ बर्थ मागितली जाते. हे दिल्यावर पुन्हा यूजरला ओटीपी पेजवर नेले जाते.
संशोधकांच्या माहितीनुसार, ही मोहीम स्टेट बँक ऑफ इंडियाकडून सुरू करण्यात आल्याची बतावणी केली जात आहे. परंतु एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटऐवजी थर्ड पार्टी डोमेनवर होस्ट केल्यामुळे ते अधिक संशयास्पद बनले आहे.
बनावट वेब पृष्ठाचा संपूर्ण लेआउट वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी अधिकृत एसबीआय नेटबँकिंग साइटसारखेच ठेवले आहे. एसबीआयने अद्याप या अहवालावर प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती.
त्याचबरोबर दुसऱ्या फसवणुकीच्या प्रकारात यूजरला आकर्षक मोफत भेटवस्तू जिंकण्याची आमिष दाखविण्यात आले. सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी भारतीय स्टेट बँक कडून 50 लाखांची मोफत भेट देण्याचे आमिष दाखविले जाते.लोकांनी सोशल प्लॅटफॉर्मद्वारे पाठविलेले संदेश उघडणे टाळावे, असे आवाहन संशोधकांनी केले आहे.
संशोधकांनी मार्च महिन्यात निदर्शनास आणून दिले होते की एसबीआयच्या कित्येक वापरकर्त्यांना फिशिंग घोटाळ्यात लक्ष्य करण्यात आले होते. तेथे हॅकर्सनी त्यांना संशयास्पद मजकूर पाठविला होता. 9,870 रुपयांच्या एसबीआय क्रेडिट पॉईंट्सची पूर्तता करण्याची विनंती केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more