प्रतिनिधी/वृत्तसंस्था
नवी दिल्ली : गेली दोन-तीन वर्षे विशेषत: covid काळात सुप्तावस्थेत गेलेले मणिशंकर अय्यर कार्ड पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये ऍक्टिव्हेट झाले आहे. काँग्रेसच्या 138 व्या वर्धापन दिन कार्यक्रमात मणिशंकर अय्यर हे राजधानी नवी दिल्लीच्या काँग्रेस मुख्यालयात हजर होते. ते केवळ हजर होते असे नव्हे, तर 24 अकबर रोड या मुख्यालयात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे भाषण करत असताना मणिशंकर अय्यर हे पहिल्या रांगेत राहुल गांधी यांच्या शेजारी बसले होते. याच रांगेत सोनिया गांधी, अंबिका सोनी, मुकुल वासनिक आदी नेतेही बसलेले दिसले. काँग्रेस हा पक्ष नसून ही जनतेची चळवळ आहे, हे काँग्रेसच्या स्थापनेपासून सिद्ध झालेले तत्त्व आहे, असे प्रतिपादन मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले.Savarkar and Modi hater Manishankar aiyer activeted in Congress again
त्याचवेळी मणिशंकर अय्यर यांनी न्यूज चॅनलला बाईट देताना संघ परिवार धर्म, भाषा, जात या नावावर देशाचे तुकडे तुकडे करून पाहत आहे. त्या विरोधात राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आहे. संघ परिवारांच्या मनसूब्यांच्या विरोधात लढण्याची जबाबदारी काँग्रेस बरोबर माध्यमांचीही आहे, असे सांगितले.
#WATCH धर्म के आधार पर, भाषा के आधार पर, जाति के आधार पर, संस्कृति के आधार पर भारत को टुकड़े-टुकड़े बनाने वाले ये संघ परिवार के लोग हैं…इसके खिलाफ ये (भारत जोड़ो) यात्रा चलाई जा रही है: कांग्रेस नेता मणिशंकर अय्यर pic.twitter.com/5U3SFwY4uX — ANI_HindiNews (@AHindinews) December 28, 2022
#WATCH धर्म के आधार पर, भाषा के आधार पर, जाति के आधार पर, संस्कृति के आधार पर भारत को टुकड़े-टुकड़े बनाने वाले ये संघ परिवार के लोग हैं…इसके खिलाफ ये (भारत जोड़ो) यात्रा चलाई जा रही है: कांग्रेस नेता मणिशंकर अय्यर pic.twitter.com/5U3SFwY4uX
— ANI_HindiNews (@AHindinews) December 28, 2022
पण मणिशंकर अय्यर हे गेली काही वर्षे राजकीय सुप्तावस्थेत गेले होते. 2017 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या वेळी ते मोदींना नीच म्हणाले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या हिंदुत्वावर त्यांनी वारंवार आक्षेप घेतला होता. इतकेच नाही तर हेच ते मणिशंकर अय्यर आहेत, ज्यांनी ते पेट्रोलियम मंत्री असताना अंदमानातल्या स्वातंत्र्य ज्योतीवरून सावरकरांच्या काव्यपंक्ती काढून टाकल्या होत्या. त्यानंतर पाकिस्तानातल्या लाहोर मधल्या कार्यक्रमात त्यांनी द्विराष्ट्रवाद सिद्धांत मोहम्मद अली जिना यांनी नव्हे, तर सावरकरांनी मांडल्याचा जावई शोध लावला होता.
2017 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान मोदींना नीच म्हटले. त्यानंतर काँग्रेसचे मोठे नुकसान झाले. भाजपच्या पराभवाची शक्यता असताना आणि काँग्रेसचा त्यावेळेस राजकीय परफॉर्मन्स उंचावत असताना मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्याने गुजरातची निवडणूक फिरल्याचे मानले गेले. त्यावेळी भाजप 99 जागांवर खाली आला होता, तर काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या.
परंतु त्या निवडणुकीनंतर हळूहळू मणिशंकर अय्यर हे राजकीय पटलावरून बाजूला झाले होते. आज 28 नोव्हेंबर 2022 रोजी काँग्रेसच्या अकबर रोडवरल्या मुख्यालयात ते पुन्हा एकदा राजकीय पटलावर आले आहेत आणि त्यांना राहुल गांधी यांच्या शेजारची खुर्ची मिळाली आहे. आगामी राजकीय वाटचालीचे हे वेगळे संकेत आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App