उत्तर प्रदेशात संयुक्त जनता दल २०० जागा लढणार ; भाजपाबरोबर जागा वाटपाची पक्षाला अजूनही आशा

वृत्तसंस्था

पाटणा : उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील राजकीय समीकरणे बदलत आहेत. बिहारमध्ये भाजपसोबत असणाऱ्या संयुक्त जनता दलाने उत्तर प्रदेशात भाजपविरोधी भूमिका जाहीर केली आहे. निवडणुकीसाठी संयुक्त जनता दलाने २०० जागांवर उमेदवार देण्याची घोषणा रविवारी केली. Sanyukta Janata Dal to contest 200 seats in Uttar Pradesh; The party still hopes to share seats with the BJP



संयुक्त जनता दलाचे वरिष्ठ नेते के. सी. त्यागी यांनी याबाबतची घोषणा केली. योगी सरकारबद्दल जनेतेच्या मनात तीव्र नाराजी आहे. सर्वांना सारखा वाटा मिळायला हवा. प्रत्येकाला स्वतःच अधिकार हवा आहे. उत्तर प्रदेशात भाजपसोबत जागा वाटपाचा तिढा सुटला नाही. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला असून आम्ही लहान पक्षांसोबतदेखील जाऊ शकतो, असे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी संयुक्त दल कोणाबरोबर युती करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

काय म्हणाले त्यागी

  • आम्ही 200 जागांवर उमेदवार जाहीर करणार आहोत. त्यातील बहुतांश उमेदवार शेतकरी आणि मागासवर्गीय असतील. याच वर्गांनी योगी आणि मोदींना सत्तेत आणले.
  • आमचे प्राधान्य भाजपसोबत निवडणूक लढण्याला आहे, मात्र जागावाटपावरून बातचीत फिस्कटल्यास आम्ही कोणाही सोबत जाऊ शकतो.
  • मुलायम सिंह यादव आमचे चांगले मित्र आहेत, मात्र आम्ही समाजवादी पक्षासोबत जाणार नाही. एमआयएमसोबत आघाडी करण्याचा प्रश्नच येत नाही.

Sanyukta Janata Dal to contest 200 seats in Uttar Pradesh; The party still hopes to share seats with the BJP

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात