Sanofi GSK : भारतात कारोना महामारीविरुद्ध तीन लसी दिल्या जात आहेत. सीरमची कोव्हिशील्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि रशियाची स्पुतनिक व्ही या तीन लसी सध्या उपलब्ध आहेत. परंतु आता लवकरच इतरही कंपन्यांच्या लस येऊ घातल्या आहेत. त्यापैकी एक GSK अर्थात GlaxoSmithKline ची लस असेल. ही लस वर्षअखेरपर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Sanofi GSK Corona Vaccine Third Clinical Trial To Start Soon
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतात कारोना महामारीविरुद्ध तीन लसी दिल्या जात आहेत. सीरमची कोव्हिशील्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि रशियाची स्पुतनिक व्ही या तीन लसी सध्या उपलब्ध आहेत. परंतु आता लवकरच इतरही कंपन्यांच्या लस येऊ घातल्या आहेत. त्यापैकी एक GSK अर्थात GlaxoSmithKline ची लस असेल. ही लस वर्षअखेरपर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
लसीचे सुरुवातीचे मानवीय परीक्षण सकारात्मक असल्याचा दावा कंपनीने केला आहे. जीसएसके ही लस फ्रेंच कंपनी Sanofi सोबत मिळवून बनवण्यात आहे. त्यांना 2021 च्या पहिल्या सहामाहीत नियामकांकडून मंजुरी मिळण्याची आशा होती, परंतु वृद्धांमध्ये या लसीची परिणामकारकता खूप कमी आढळल्याने उशीर झाला. लवकरच लसीच्या तिसऱ्या चाचणीला सुरुवात होणार आहे.
GSKने सोमवारी सांगितले की, दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीच्या निकालात विषाणूला निष्क्रिय करणारा मजबूत अँटीबॉडी रिस्पॉन्स प्रत्येक वयाच्या माणसांमध्ये दिसून आला, यामुळे आरोग्याचा धोकाही उपलब्ध झाला नाही. यानंतर तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीचा मार्ग मोकळा झाला. कंपनीच्या लस विभागाचे अधिकारी रॉजर कोन्नोर म्हणाले की, “ही लस कोरोनाविरुद्ध युद्धात खात्रीशीरपणे प्रभावी आहे, या वर्षाच्या अखेरपर्यंत ती उपलब्ध करण्याचे आमचे उद्दिष्ट नक्कीच साध्य होईल, अशी आशा आहे.”
लसीच्या तयारीत Sanofiच्या हंगामी फ्लू लसीशी मिळतेजुळते तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. यासोबतच GSKने तयार केलेल्या एका सहायकाचाही वापर करण्यात आला आहे, जे लसीसाठी बूस्टरचे काम करेल. तिसऱ्या टप्प्यातील मानवी परीक्षण सुरू होण्याची शक्यता आहे. अनेक देशांतून 35,000 स्वस्थ वयस्कांना या परीक्षणात सामील केले जाईल.
मानव परीक्षणात लसीच्या दोन फॉर्म्युल्यांना कोरोना विषाणूच्या विविध व्हेरिएंट्सविरुद्ध वुहान (D614) आणि आफ्रिका (B.1.351) व्हेरिएंट्सविरुद्धही तपासले जाईल. कंपनीची अपेक्षा आहे की, त्यांना लसीसाठी नियामकांकडून वर्षाच्या चौथ्या तिमाहीत मंजुरी मिळून जाईल. विशेष म्हणजे ही लस सामान्य तापमानावरही साठवली जाऊ शकेल.
Sanofi GSK Corona Vaccine Third Clinical Trial To Start Soon
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App