‘ही’ कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Sanju Samson दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डरबन येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात संजू सॅमसनने शानदार शतक झळकावून खळबळ उडवून दिली आहे. त्याने 47 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. यासह संजू सॅमसन आता आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटच्या इतिहासात सलग दोन डावात शतके झळकावणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. सॅमसनने याआधी बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात 111 धावांची इनिंग खेळली होती. आता त्याच्या पुढच्याच डावात सॅमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावले आहे.Sanju Samson
या सामन्यात संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी टीम इंडियासाठी सुरुवात केली. अभिषेक अवघ्या 7 धावा करून बाद झाला, पण दुसऱ्या टोकाकडून संजू क्रीजवर राहिला. त्याने 27 चेंडूत अर्धशतक झळकावले. यानंतर पुढच्या 20 चेंडूत त्याने 50 धावा केल्या. संजूने कर्णधार सूर्यकुमार यादवसोबत 66 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. त्याला तिलक वर्मानेही चांगली साथ दिली आणि 18 चेंडूत 33 धावांचे योगदान दिले.
सलग दोन T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतक झळकावणारा संजू सॅमसन आता पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी फ्रान्सचा गुस्ताव्ह मॅककीन, दक्षिण आफ्रिकेचा रिले रुसो आणि इंग्लंडचा फिल सॉल्ट यांनी टी-२० क्रिकेटमध्ये सलग दोन शतके झळकावण्याचा पराक्रम केला आहे. या सामन्यात नाकाबायोमजी पीटरने संजूला बाद केले. संजूने 50 चेंडूत 107 धावांची खेळी खेळली. या काळात त्याच्या बॅटमधून 7 चौकार आणि 10 षटकार आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App