गोव्यात सिंगल डिजिट जागांच्या मुद्द्यावरून संजय राऊत – वडेट्टीवार यांचे वार – पलटवार!!

प्रतिनिधी

पणजी/ भंडारा : गोव्यात काँग्रेसने महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी आघाडी करण्याचे नाकारल्यानंतर संजय राऊत यांनी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला जोरदार चिमटे काढले आहेत.Sanjay Raut – Vadettiwar’s fight on the issue of single digit seats in Goa – counterattack

आम्ही खूप प्रयत्न केले. परंतु काँग्रेसने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची दखल घेतली नाही. काँग्रेसच्या नेत्यांना गोव्यात 40 पैकी 45 जागा निवडून येतील, असा आत्मविश्वास वाटतो आहे. त्या आत्मविश्वासाला आम्ही का तडा द्यावा?, असा खोचक सवाल करून संजय राऊत यांनी काँग्रेसला टोला हाणला आहे. गोव्यात काँग्रेसच्या सिंगल डिजिट जागा निवडून येतील, असा दावाही त्यांनी केला आहे.



संजय राऊत यांच्या खोचक वक्तव्यांना काँग्रेसचे महाराष्ट्रातले मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भंडार्‍यातून प्रत्युत्तर दिले आहे. महाविकास आघाडी महाराष्ट्र सत्तेवर आहे. बाहेरच्या राज्यांमध्ये कोणत्या पक्षाशी युती करायची अथवा आघाडी करायची याचा निर्णय काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी घ्यायला मोकळे आहेत.

बाकी गोव्यामध्ये कोणामुळे कोणत्या पक्षाच्या सिंगल डिजिट जागा निवडून येतील हे लवकरच ठरेल. त्यासाठी संजय राऊत यांच्या सल्ल्याची काँग्रेसला गरज नाही, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे.

गोव्यात काँग्रेस मजबूत स्थितीत आहे. महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीतल्या इतर घटक पक्षांचे गोव्यात राजकीय अस्तित्व देखील नाही, असा टोला त्यांनी संजय राऊत आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना लगावला आहे.

Sanjay Raut – Vadettiwar’s fight on the issue of single digit seats in Goa – counterattack

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात