आदळ आणि आपट; गोळीबार, उखळीबार चाललेत नुसते फुकट!!

नाशिक : आदळ आणि आपट; गोळीबार, उखळीबार चाललेत नुसते फुकट!!, असे म्हणायची वेळ आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर आली आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्टपणे राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूचीचा वापर करून निकाल देणार असल्याचे सूचित केल्यानंतरही शिवसेनेच्या ठाकरे गटाने राजकीय गोळीबार आणि उखळीबाराचे नुसते आवाज काढणे चालू ठेवले आहे. विधानसभेच्या अध्यक्षांना रोज घेरण्याचे काम चालू आहे. ते आज निकालाच्या दिवशी कायम आहे. Sanjay Raut targets modi, shinde and narvekar is an futile exercise

संजय राऊत यांनी घेतलेल्या आजच्या नियमित पत्रकार परिषदेत त्यांनी या वादात आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच ओढले. मोदींकडे असा कुठला कॉन्फिडन्स आला की, त्यांनी हे बेकायदा सरकार अस्तित्वात असताना रोड शो करायला ते महाराष्ट्रात येणार आहेत, असा सवाल राऊत यांनी केला.

मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर देखील त्यांनी असेच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आजचा निकाल ही मॅच फिक्सिंग आहे हे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यावरूनच सिद्ध होते, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

वास्तविक पंतप्रधान मोदी हे राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिक मध्ये येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा महाराष्ट्रातल्या कुठल्याही सरकार अस्तित्वात असो अथवा नसो याच्याशी काहीही संबंध नाही. मुख्यमंत्र्यांचा दावोस दौरा हा 3 महिन्यांपूर्वी निश्चित झाला आहे. महाराष्ट्रातला कुठलाही नेता मुख्यमंत्री असला तरी तो दावोस दौऱ्यावर गेलाच असता. त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तिथे जाणे यात कुठलीही नवीन बाब नाही, पण तरी देखील बादरायणी संबंध जोडून संजय राऊत यांनी आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचे दौरे वादग्रस्त ठरवले.

इतकेच काय पण उल्हास बापट आणि असीम सरोदे या घटनातज्ञांनी देखील अशाच पद्धतीची वातावरण निर्मिती केली. राज्य घटनेचा आणि तिच्यातील विविध कलमांचा आपण लावतो तोच अर्थ 100% सत्य आणि इतर लावतात ते अर्थ 100% असत्य या गृहीतकावर आधारित या घटनातज्ञांची वक्तव्य आहेत आणि तोच ठाकरे गटाचा आधार आहे. परंतु हाच ठाकरे गट विधानसभा अध्यक्षांवर रोज हेत्वारोप लावून त्यांच्याकडून न्यायची अपेक्षा करत आहेत. ही यातली गंभीर विसंगती आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी या विसंगतीवर अनेकदा बोट ठेवले आहे. ज्यांच्यावर आरोप करतात त्यांच्याकडून तुम्ही न्यायाची अपेक्षा कशी ठेवू शकता??, असे त्यांनी अनेकदा सुचित केले आहे, तरी देखील हे राजकीय आदळ आपट बार आणि उखळी तोफांचे बार काढणे थांबलेले नाही.

– हेत्वाआरोपातून निकाल बदलेल का??

राहुल नार्वेकरांनी स्पष्टपणे आपण राज्यघटनेच्या दहाव्या सूचीचा वापर करून निकाल देऊ असे सूचित केले. यातून दोन्ही गटांना दोन्ही गटांचे एकमेकांच्या विरोधातले अपात्रतेचे अर्ज फेटाळण्याचा अधिकार ते वापरू करू शकतात. अर्थातच दोन्ही गटांचे आमदार अपात्र न करता त्यांचे आधीच विधानसभेतले स्वतंत्र अस्तित्व मान्य केल्याचा आधार ते देऊ शकतात. अशा स्थितीत ज्या गटाला ते निकाल अमान्य आहेत ते अर्थातच सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावू शकतात. हा निकाल इतका स्वच्छ आणि स्पष्ट असताना केवळ तो आपल्या विरोधात गेला म्हणून ठाकरे गट थेट राज्यघटनेचा अर्थ ठरविण्याचा अधिकार हा फक्त आपला आणि आपलाच आहे, अशी मक्तेदारीची भूमिका घेऊन पंतप्रधान मोदींपासून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापर्यंत हेत्वारोप करत सुटला आहे. पण याने निकाल बदलण्याची सुतराम शक्यता नाही.

Sanjay Raut targets modi, shinde and narvekar is an futile exercise

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात