हिंदुत्वाच्या मिशांना पीळ भरत, संजय राऊतांकडून Waqf board सुधारणा बिलाचा विषय डायव्हर्ट!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : हिंदुत्वाच्या मिशांना तीळ भरत संजय राऊतांकडून वखोर सुधारणा दिलाचा विषय डायवर असे आज त्यांच्या नियमित पत्रकार परिषदेतूनच समोर आले.Sanjay Raut divert waqf board bill to jain community

त्याचे घडले असे

संजय राऊत यांनी नियमित पत्रकार परिषदेत हिंदुत्वाच्या मिशांना पीळ भरला. देवेंद्र फडणवीस यांना मिशा फुटल्या नव्हत्या, तेव्हापासून आम्ही आमच्या मिशांना हिंदुत्वाचा पीळ भरतोय. त्यामुळे त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, असे संजय राऊत म्हणाले, पण त्याचवेळी त्यांनी Waqf board सुधारणा बिलाचा विषय डायव्हर्ट केला.



संसदेत सरकार ज्यावेळी Waqf board सुधारणा सुधारणा विधेयक मांडेल, त्यावेळी फ्लोअरवर करायचे ते आम्ही करू. ते आत्ताच सांगत नाही. 370 कलम हटवले तेव्हा आम्ही पाठिंबा दिला, कारण तो राष्ट्रीय सुरक्षा आणि हिंदुत्वाचा विषय होता. ट्रिपल तलाक विरोधी कायद्याला देखील आम्ही पाठिंबा दिला, कारण तो गरीब मुस्लिम महिलांची संबंधित प्रश्न होता, पण waqf board सुधारणा विधेयकातून मुस्लिमांची प्रॉपर्टी हडप करून ती एखाद्या बिल्डरला किंवा उद्योजकाला द्यायचा घाट घातला जातोय, तो आम्हाला मान्य नाही. देवेंद्र फडणवीस यांनी waqf board सुधारणेचा विषय उगाचच हिंदुत्वाशी जोडू नये. फडणवीसांना मिशा फुटल्या नव्हत्या, तेव्हापासून आम्ही हिंदुत्वाच्या मिशांना पिळ भरतोय. तिकडे मुंबई हिंदुत्वाच्याच कक्षेत असलेल्या जैन समाजातल्या बिल्डर लोकांनी हिंदूंना घरे नाकारलीत. ते हिंदू मांसाहारी आहेत म्हणून भाजपशी संबंधित जैन बिल्डर लोकांनी असले प्रकार सुरू केलेत. त्यांच्या विरोधात भाजपने बिल आणावे. आम्ही त्याला पाठिंबा देऊ. हे मी हिंदू म्हणूनच बोलतोय हे लक्षात घ्या, असे त्यांनी असे संजय राऊत यांनी फडणवीस यांना सुनावले.

पण या सगळ्या वक्तव्यातून संजय राऊत यांनी waqf board सुधारणेचा विषय जैन समाजावर घसरवून ड्रायव्हर्ट करून टाकला आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची कातडी बचावायचा प्रयत्न केला.

Sanjay Raut divert waqf board bill to jain community

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात