संजय निरूपम यांनी काढले काँग्रेस नेतृत्वाचे वाभाडे, म्हणाले- काँग्रेसमध्ये एक नव्हे 5 सत्ताकेंद्रे, कार्यकर्ते निराश

Sanjay Nirupam criticized the Congress leadership

विशेष प्रतिनिधी

मुंबई : काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या माजी खासदार संजय निरुपम यांनी 4 एप्रिल रोजी काँग्रेसवर गंभीर आरोप केले. काँग्रेसमध्ये सोनिया, राहुल, प्रियंका, नवे अध्यक्ष खरगे आणि वेणुगोपाल ही 5 वेगवेगळी सत्ताकेंद्रे आहेत. काँग्रेसमध्ये वैचारिक संघर्ष सुरू असून, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये घोर निराशा पसरली आहे, असे ते म्हणालेत. Sanjay Nirupam criticized the Congress leadership

निरुपम म्हणाले की, राहुल गांधींच्या आसपास असणाऱ्या डाव्यांचा श्रद्धेवर विश्वास नाही. एकट्या काँग्रेसने राम लल्लाच्या अभिषेकाच्या निमंत्रणाला उत्तर म्हणून पत्र लिहून हा भाजपचा प्रचार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी रामाचे अस्तित्व नाकारले.

तत्पूर्वी, संजय निरुपम यांनी गुरुवारी सकाळी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे, आपण पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आपली हकालपट्टी केल्याचा दावा केला. खरगे यांनी बुधवारी रात्री शिस्तभंग व पक्षविरोधी विधान केल्याप्रकरणी निरुपम यांची पक्षातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी करण्यास मंजुरी दिली होती.

निरुपम यांनी आपल्या पोस्टमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांना पाठवलेल्या राजीनाम्याचे छायाचित्र शेअर केले. त्यात ते म्हणाले की, असे दिसते की काल रात्री माझा राजीनामा प्राप्त होताच पक्षाने माझी हकालपट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला. एवढी तत्परता पाहून छान वाटले.



काय म्हणाले संजय निरुपम?

काँग्रेसमध्ये पाच वेगवेगळी सत्ताकेंद्रे आहेत. आणि या पाचही जणांची स्वतःची लॉबी आहे. ते कायम एकमेकांशी वाद घालत राहतात. या पाच केंद्रांमध्ये सोनिया गांधी पहिल्या, राहुल गांधी दुसऱ्या, प्रियंका गांधी तिसऱ्या, अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे चौथ्या आणि काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल पाचव्या स्थानावर आहेत. हे सर्वजण आपापल्या परीने राजकारण करत आहेत.

काँग्रेसमध्ये वैचारिक संघर्ष सुरू आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये निराशा पसरली आहे. काँग्रेस पक्ष हा पूर्णपणे दुभंगलेला असून त्याची विचारधारा दिशाहीन झाली आहे. येणाऱ्या काळात अनेक गोष्टी नष्ट होतील, असे निरुपम म्हणाले.

काँग्रेस म्हणते की हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. यात काही गैर नाही. गांधीजींच्या धर्मनिरपेक्षतेमध्ये कोणत्याही धर्माला विरोध नव्हता. नेहरूजींच्या धर्मनिरपेक्षतेत ही बरोबर व ही चूक अशी गोष्ट होती. पण, आज नेहरूंची धर्मनिरपेक्षतेची विचारधारा संपली आहे. पण काँग्रेस हे मान्य करण्यास तयार नाही. सध्या हा पक्ष डावी विचारधारा घेऊन वेगाने वाटचाल करत आहेत. त्यांनी स्वतःच स्वतःला संपवले आहे.

राहुल गांधींच्या आसपास डाव्या विचारांचे लोक आहेत. हे लोक अयोध्येत रामाच्या उपस्थितीला विरोध करतील. त्यांचा श्रद्धेवर विश्वास नाही. रामलला विराजमान यांच्या कार्यक्रमाला अनेकांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यानंतर सर्वांनी आदराने पत्र मिळाल्याचे व वेळ मिळेल तेव्हा येण्याचे प्रत्युत्तर दिले. या उत्सवावर कोणीही प्रश्न विचारला नाही. पण काँग्रेसने एकट्याने हा भाजपचा अपप्रचार असल्याचा आरोप केला. एकप्रकारे त्यांनी रामाचे अस्तित्व नाकारले, असे निरुपम म्हणाले.

Sanjay Nirupam criticized the Congress leadership

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात