विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: मुंबईतील एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची एनसीबीच्या दक्षता पथकाने आज ४ तासांहून अधिक काळ चौकशी केली. त्यासाठी त्यांना दिल्ली येथील कार्यालयात पाचारण करण्यात आले होते.Sameer Wankhede summoned again to NCB headquarters, interrogated for more than four hours
गेल्या बुधवारी समीर वानखेडे यांची दक्षता पथकाने सुमारे ४ तास चौकशी केली होती. यानंतर दुसऱ्यांदा चौकशी करण्यात आली आहे. मुंबईत क्रूझ पार्टीवरील छाप्यात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. आर्यन खानच्या सुटकेसाठी समीर वानखेडेंनी कोट्यवधींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ही चौकशी करण्यात आली.
एनसीबीच्या दक्षता पथकामध्ये ५ सदस्य आहेत. वानखेडे यांची आज दक्षता पथकाकडून जवळपास साडेचार तास चौकशी केली गेली. वानखेडे यांनी आपला जबाब दक्षता पथकाकडे नोंदवला आहे. या प्रकरणी वानखेडे यांनी मुंबईतील सीआरपीएफ कॅम्पमधील ऑफीसमध्ये चौकशी झाली होती.
समीर वानखेडे हे आज सकाळीच दिल्लीत दाखल झाले होते. बनावट जात प्रमाणपत्राच्या आरोपांप्रकरणी वानखेडे हे दिल्लीत पोहोचले. त्यांनी राष्ट्रीय अनुसूचित आयोगाकडे आपली सर्व कागदपत्रे सादर केली. महाराष्ट्राचे अल्पसंख्याकमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते यांनी वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहेत.
वानखेडे यांनी नोकरीसाठी बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. यानंतर वानखेडे यांनी अनुसूचित आयोगाकडे तक्रार केली होती. या पार्श्वभूमीवर आता अनुसूचित आयोगाने वानखेडे यांचा जबाब नोंदवला आहे. आता आयोगाकडून चौकशी करण्यात येणार आहे. त्यानंतर निर्णय दिला जाणार आहे. अनुसूचित आयोगाकडे आपलं म्हणणं नोंदवल्यानंतर वानखेडे हे दिल्लीतील एनसीबीच्या मुख्यालयात दाखल झाले.
एनसीबीच्या दक्षता पथकाने खंडणीचा आरोप करणाºया प्रभाकर साईललाही बोलावले होते. मात्र, प्रभाकर साईल याच्याशी अद्याप संपर्क झाला नसल्याचे दक्षता पथकाचे प्रमुख ग्यानेश्वर सिंह यांनी सांगितले. प्रभाकर या बाबतीत अत्यंत महत्त्वाचा साक्षीदार आहे. दक्षता पथकाच्या प्रश्नांना उत्तरे दिल्यानंतर समीर वानखेडे बाहेर आले. पण बाहेर आल्यावर तिथे उपस्थित माध्यमांशी वानखेडे काहीही बोलले नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App