वृत्तसंस्था
लखनौ : देशपातळीवर ममता बॅनर्जी या सर्व विरोधी पक्षांचे ऐक्य घडविण्याचा प्रयत्न करत असतानाच उत्तर प्रदेशात या ऐक्याला धोका निर्माण झाल्याची चिन्हे आहेत. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती झाली असून सध्यातरी त्यांनी गांधी परिवाराच्या काँग्रेसला या युतीपासून दूर ठेवले आहे.Samajwadi party – NCP alliance in Uttar Pradesh; Congress out for time being
काँग्रेसच्या उत्तर प्रदेश प्रभारी प्रियांका गांधी यांनी काँग्रेस पक्ष समविचारी पक्षांशी युती करण्यासाठी खुल्या मनाने विचार करतो, असे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर सध्या काँग्रेसला अखिलेश यादव आणि शरद पवार यांनी दूर ठेवल्याने विरोधकांच्या एकजुटीच्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह लागले आहे.
भाजपाला सत्तेपासून रोखण्यसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने देशपातळीवर प्रयत्न सुरु केल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यातूनच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने समाजवादी पक्षाबरोबर मैदानात उतरण्याची तयारी केली आहे.
उत्तर प्रदेशच्या २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पक्षाबरोबर युती करेल. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस के. के. शर्मा आणि प्रदेशाध्यक्ष उमाशंकर यादव यांनी लखनौमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
के. के. शर्मा मंगळवारी लखनौमध्ये होते. उत्तर प्रदेश प्रेस क्लबमध्ये शर्मा यांनी माध्यमांना सांगितले की, उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी मुख्य विरोधी पक्ष समाजवादी पक्षाच्या नेतृत्वात सर्व विरोधी पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यासाठी राष्ट्रवादीने प्रयत्न सुरू केले असल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालसारखे उत्तर प्रदेशात देखील भाजपला सत्तेत येण्यापासून रोखण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. येथे समाजवादी बरोबर आम्ही एकत्र निवडणुका लढवू आणि भाजपाला रोखू, असा दावा शर्मा यांनी केला आहे.
शर्मा म्हणाले की, शरद पवार यांनी म्हटले आहे की, राष्ट्रवादीला उत्तर प्रदेशातील तरुण आणि शेतकऱ्यांचा आवाज उठवावा लागेल कारण तेथील भाजपा सरकार लोकशाहीला धोका निर्माण करीत आहे. जो कोणी आवाज उठवत आहे, त्यांच्यावर कारवाई केली जात आहे आणि आवाज दडपला जात आहे.
शर्मा म्हणाले की, जबरदस्तीने धर्मांतर करणे चुकीचे आहे, परंतु जर कोणी स्वत: च्या इच्छेनुसार धर्मांतर करीत असेल तर त्याला काय हरकत नसावी. प्रदेशाध्यक्ष उमाशंकर यादव म्हणाले की, १ ऑगस्टपासून राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर ‘राज्य वाचवा, संविधान वाचवा’ आंदोलन सुरू करेल. यात शेतकरी आणि युवकांवर लक्ष केंद्रीत केले जाईल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App