विशेष प्रतिनिधी
बुलंदशहर : उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय लोकदल आघाडीचे नाव न घेता त्यांचा उल्लेख सडलेला माल असा करत सरकारमध्ये येण्याचे त्यांचे स्वप्न कयामतच्या दिवसापर्यंतही पूर्ण होणार नाही. 10 मार्चनंतर पूर्ण गर्मी शांत करू, असा हल्लाबोल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला.Samajwadi Party is rotten goods, will not come to power till doomsday, says Yogi Adityanath
बुलंदशहर येथे निवडणूक प्रचार रॅलीत बोलताना योगी आदित्यनाथ मुझफ्फरनगर दंगलीचा उल्लेख करत म्हणाले, 2013 मध्ये मुझफ्फरनगर दंगल झाली तेव्हा सचिन आणि गौरव नावाच्या दोन जाट तरुणांची निर्घृण हत्या करण्यात आली. तेव्हा लखनौचा पोरगा सत्तेत होता, हत्या करवत होता.
मारेकºयांना आश्रय देत होता आणि दंगलखोरांना लखनौला बोलावून त्यांना सन्मानित करत होता. दंगलखोरांविरुद्ध आवाज उठवणाºया भाजप कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे दाखल करून तुरुंगात डांबले जात होते. दिल्लीचा पोरगा तेव्हाही तमाशा करत म्हणायचा की, दंगेखोरांवर कठोर कारवाई व्हायला नको.
ते तेव्हाही त्यांचा बचावच करत होते. हे लोक पुन्हा नव्या कव्हरमध्ये आले आहेत. माल तोच आहे, कव्हर नवीन आहे. माल तोच सडलेला आहे, ज्यांनी असुरक्षितता, दंगली आणि माफिया दिले. ते आजही म्हणत आहेत, येऊ द्या सरकार. आम्ही म्हणालो, असे होणार नाही. कयामतच्या दिवसापर्यंत तुमचे स्वप्न पूर्ण होणार नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App