
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 8 वर्षे पूर्ण होताना “मोदी@20” या ग्रंथाचे प्रकाशन भारतातल्या दिग्गज नेत्यांच्या हस्ते झाले आहे. यामध्ये उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा समावेश आहे. या अनोख्या सोहळ्यात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी मोदी सरकारच्या 8 वर्षांच्या डिप्लोमसीचे रहस्य अतिशय नेमक्या आणि मोजक्या शब्दांत उलगडल्याचे दिसले आहे. S. Jaishankar reveals the secret of “Modi Diplomacy Focus”
जयशंकर म्हणाले :
- मोदी सरकारने गेल्या 8 वर्षात काय केले??, तर भारताला सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वारशात मिळालेल्या अंतःसामर्थ्याची जाणीव जगाला करवून दिली.
- जनता केंद्रित धोरणे आखली. विकास केंद्रित रणनीती आणि राजनीतीला महत्त्व दिले.
- परदेश दौऱ्यामध्ये देखील विकासाची रणनीती नीती राबवली. देशांतर्गत आणि सीमा सुरक्षेला अनन्यसाधारण महत्त्व देत तेथे पायाभूत सुविधांच्या मजबुतीकरणाला प्राधान्य दिले.
- परदेशांमधल्या सर्व भारतीय दूतावासांना देशाच्या 400 अब्ज डॉलर निर्यातीचे लक्ष्य पूर्ण करण्यात सहभागी करून घेतले.
- विकास केंद्रित राजकारण करताना जनधन योजनेपासून पिक विमा योजनेपर्यंत सर्व ठिकाणी तंत्रज्ञानाचा उत्तम वापर करून मध्यस्थांना हटविले.
#WATCH 8 years of Modi govt led to global debate on terrorism. He has practiced development-focused diplomacy, focused on border infra development to meet security challenges; takes interest in trade, & addressed all our embassies to reach $400 bn exports: EAM S Jaishankar, Delhi pic.twitter.com/MHJCHkRHGm
— ANI (@ANI) May 11, 2022
- परदेश दौऱ्यामध्ये ग्रीन टेक्नॉलॉजी, सस्टेनेबल टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट अँड ट्रान्सफर वर लक्ष केंद्रित करून तिचा भारतात उपयोग केला.
- परदेशातल्या सर्वसामान्य सुविधा भारतीयांना उपलब्ध करून देण्यासाठी भांडवली गुंतवणूक वाढवून अधिकाधिक पायाभूत सुविधा मजबूत केल्या.
- देशाच्या संरक्षणाचे अनन्यसाधारण महत्व ओळखून सीमावर्ती क्षेत्रात पायाभूत सुविधा मजबूत केल्या. याचे प्रत्यंतर उरी, डोकलाम पासून लडाख पर्यंत भारताच्या बदललेल्या संरक्षण आणि परराष्ट्र धोरणात आले आहे.
- मोदींनी गेल्या 8 वर्षात रणनीती आणि राजनीतीचा उत्तम वापर करत “दहशतवाद” हा मुद्दा जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आणला.
- भारत दहशतवादापुढे झुकणार नाही. आपल्या संरक्षण गरजा पूर्ण करण्यात कोठेही कमी पडणार नाही याची ग्वाही मोदींनी आपल्या राजनैतिक कौशल्याने आणि कृतीने जगाला दिली.
- भारताच्या या सकारात्मक पावलांकडे जगाने सुरुवातीला उत्सुकतेने आणि आता आश्वासकतेने पाहिले आहे.
- मोदी सरकारच्या 8 वर्षांमध्ये जगाला भारताला वर्षातून प्राप्त झालेल्या अंत:सामर्थ्याची जाणीव झाली आहे.
S. Jaishankar reveals the secret of “Modi Diplomacy Focus”
महत्वाच्या बातम्या
- ॲवॉर्ड वापसी : ममता बॅनर्जींना साहित्य पुरस्कार दिल्याच्या निषेधार्थ बंगाली लेखिकेने पुरस्कार केला परत!!
- प्रशांत किशोरचा झाला “राज ठाकरे”…; कोणीतरी मजबूत विरोधी पक्ष द्या हो!!
- NIA Court : काश्मिरी दहशतवादी बिट्टा कराटे, शब्बीर शाह, हाफिज सईद, सय्यद सलाउद्दीनवर युएपीए आरोपपत्र दाखल!!
- सिध्दू म्हणतात, पंजाबमध्ये आता गद्दारांची खैर नाही, कॉँग्रेसच्या नाकावर टिच्चून घेतली मुख्यमंत्री मान यांची भेट
- NFHS Survey : स्री – पुरुष समानतेच्या दिशेने; 82% महिला पतीला सेक्ससाठी थेट नकार देऊ शकतात, तर 66% पुरुष म्हणतात, “इट्स ओके”!!