‘कोलकाता डॉक्टर प्रकरण अत्यंत दुर्दैवी’, असल्याचं म्हटले आहे..
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये ( West Bengal )महिला डॉक्टरांवरील अत्याचाराच्या घटनेवरून संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) देखील महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निषेध केला आहे आणि त्याला ‘अत्यंत दुर्दैवी’ म्हटले आहे.
RSS समन्वय बैठकीत अत्याचार पीडित महिलांना जलद न्याय मिळवून देण्यासाठी कायदे आणि दंडात्मक कृतींचे पुनरावलोकन करण्याच्या गरजेवर भर देण्यात आला.
आरएसएस अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी सांगितले की, कोलकाता रुग्णालयात ३१ वर्षीय महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या झाल्याच्या घटनेवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. आंबेकर म्हणाले की ही “अत्यंत दुर्दैवी घटना” आहे आणि “प्रत्येकजण त्याबद्दल चिंतित आहे”.
देशात अशाच प्रकारच्या घटना वाढत असून, सरकार, अधिकृत यंत्रणा, कायदे, दंडात्मक कारवाई, कार्यपद्धती यावर बैठकीत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. संघ पाच आघाड्यांवर प्रचार करणार असल्याचे संघाच्या बैठकीत ठरले. यामध्ये संस्कार, कायदा आघाडी, जागरूकता, शिक्षण, स्वसंरक्षण यांचा समावेश आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App