Manoj Jarange : महायुती + महाविकास आघाडीतल्या नाराजांना जरांगेंच्या उमेदवारीचे दरवाजे सध्यातरी बंद!!

Manoj Jarange

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Manoj Jarange : विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करून भाजपच्या मागे हात धुवून लागलेल्या मनोज जरांगे विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली असताना जरांगे नेमकी कोणत्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उमेदवारी मिळावी म्हणून अनेकजण मनोज जरांगे यांना भेटतही आहेत. इच्छुकांचे सुमारे 1000 तरी अर्ज जरांगे यांच्याकडे आले आहेत. जरांगे महाविकास आघाडी आणि महायुतीतील इच्छुकही उमेदवारीसाठी येत आहेत. दोन्ही आघाड्यातील या नाराजांना जरांगे तिकीट देणार का?? असा सवाल तयार झाल्यावर जरांगे यांनी सध्यातरी महायुतीच्या आणि महाविकास आघाडीतल्या नाराजांसाठी दरवाजे खुले केलेले नाहीत. Manoj Jarange for now will not entertain rebellions in mahayuti and MVA

मनोज जरांगे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. महायुती आणि महाविकास आघाडीतल्या नाराजांना आम्ही आमच्या सोबत घेणार नाही. त्यांना सोबत घेऊन आमच्यातल्या इच्छुकांचं आम्ही काय करू??, असा उलटा सवाल जरांगे यांनी केला. विधानसभा लढवायचेच ठरले, तर उमेदवारांची नावे समाजासमोर ठेवून समाजाच्या संमतीने नावे निवडू. आमची एकजूट असल्याने कोणी कोणाचे पाय खेचनार नाही, असा दावा मनोज जरांगे यांनी केला.

मला मुख्यमंत्री व्हायचं नाही

मला मुख्यमंत्री व्हायचं नाही. माझी ती इच्छा नाहीच. तसं असतं तर जाहीर केलं असतं. इतरांना म्हटलं असतं तुम्ही आमदार व्हा. मला माझा स्वार्थ पाहायचा नाही, समाजासाठी लढायचं आहे. सरकारला आमची विधानसभेची भूमिका पहायची होती, पण त्यांनी निवडणुका पुढं ढकलल्या. मग आम्हीपण आमचा निर्णय पुढं ढकलला आहे, असं मनोज जरांगे Manoj Jarange म्हणाले.

मराठ्यांची फडणवीस यांच्यावर नाराजी

विधानसभेला कोण टार्गेट असेल हे आताच सांगणार नाही. लोकसभेला समाजाने ताकद दाखवून दिली आहे, विधानसभेतही दाखवू. राज्यभर दौरे सुरू आहेत. या दरम्यान समाजासोबत विधानसभेबाबत चर्चा करत नाही. मुळात आमच्याकडे उमेदवारचं उमेदवार आहेत. निवडणूक लढण्याची इच्छा असणारे राजकीय नेते मला भेटायला येतात. मीडिया निघून गेल्यावर ते माझ्याकडे येतात. आम्ही 10वर्षे कामं करतोय अन् तीन पक्ष एकत्र आलेत. मग आमचं काय होणार? आम्हाला हे घराणं नको, असं हे नेते सांगत आहेत. एक म्हणतो, हे घराणं नको तर दुसरा म्हणतो, ते घराणं नको. भाजपमधील मराठ्यांची तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर खूप नाराजी आहे, असा दावाही त्यांनी केला.


SC judge : सुप्रीम कोर्टाचे जज म्हणाले- नेते गुन्हेगारांना फाशीचे आश्वासन देतात, पण निर्णय घेणे कोर्टाचे काम


मी राजकीय बोलणारच

देवेंद्र फडणवीस आमचे विरोधक नाहीत अन् शत्रूही मानलेले नाही. फक्त मराठ्यांचा द्वेष करण्याची वागणूक त्यांची चांगली नाही. ते मराठेच मराठ्यांच्या अंगावर सोडतात. फडणवीस हे कोणत्याच मंत्र्याला अन् आमदारांना काम करू देत नाहीत. अगदी आरक्षणाबाबतही बोलू देत नाहीत. फडणवीस साहेब मी आज सांगतो, मला राजकारणात जायचं नाही. आमच्या समाजालाही राजकारणात जायचं नाही. पण आरक्षण दिलं नाही तर मी राजकीय बोलणार म्हणजे बोलणारच, असा इशारा त्यांनी दिला.

ते होऊ देणार नाही

राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, याची सखोल चौकशी व्हावी. फक्त याचं राजकारण करू नका. आरडाओरडा करून तुम्ही आरक्षणाचा विषय मागे पाडण्याचा डाव करत असाल तर ते आम्ही होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

लाडकी बहीण योजना आणली, ही चांगलीच. पण आरक्षणाचे काय? दाजी तर चिखलात काम करून मेला की. त्याचं काय? हे फक्त नादी लावतात. बरं हे सगळं आमच्या करातून सुरू आहे. कर्तव्यदक्ष सरकार आमचेच पैसे आम्हाला देतंय, असं ते म्हणाले.

Manoj Jarange for now will not entertain rebellions in mahayuti and MVA

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात