विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी पंचजन्य आणि ऑर्गनायझर या नियतकालिकांना दिलेल्या मुलाखतीमध्ये देशात हिंदुत्व राजकीय दृष्ट्या consolidate अर्थात दृढमूल झाले, असे जे वक्तव्य केले, त्याकडे माध्यमांनी पूर्ण दुर्लक्ष केले आहे, तर विरोधकांनी मोहन भागवतांच्या वक्तव्याचा हिंदू – मुस्लिम असा विपर्यास करून त्यावर बवाल सुरू केला आहे. RSS Chief Dr. Mohan Bhagwat insists on Consolidation of Hindutva, but opposition harps on old hindu – muslim conflict
वास्तविक डॉ. मोहन भागवत यांनी पंचजन्य आणि ऑर्गनायझरच्या मुलाखतीत देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वाटचाल कशी मजबुतीने सुरू आहे, हिंदुत्व राजकारणाच्या केंद्रस्थानी येऊन ते Consolidate अर्थात दृढमूल कसे झाले आहे, याचे सविस्तर वर्णन केले आहे. इतकेच नाही तर करंट टॉपिक म्हणून संघात महिलांचे स्थान, त्यावरून होणारी टीका, LGBT समुदायाच्या मुद्द्यावर संघाचे मत, कुटुंब प्रबोधनाची गरज वगैरे महत्त्वाच्या बाबींवर सटीक भाष्य करून सखोल विश्लेषण केले आहे. पण माध्यमांनी मात्र त्यातला स्वतःला हवा तो निवडक भाग उचलून त्याच्या उथळ बातम्या चालवल्या आणि त्यावर सर्व विरोधी पक्षांनी हिंदू – मुस्लिम हा बवाल उभा केला आहे.
पाञ्चजन्य पर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सरसंघचालक डॉ मोहन जी भागवत का पाञ्चजन्य के संपादक श्री हितेश शंकर जी द्वारा विशेष साक्षात्कार। पढ़िए पाञ्चजन्य का नवीन अंक…. pic.twitter.com/kSDSMzfReo — Panchjanya (@epanchjanya) January 8, 2023
पाञ्चजन्य पर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सरसंघचालक डॉ मोहन जी भागवत का पाञ्चजन्य के संपादक श्री हितेश शंकर जी द्वारा विशेष साक्षात्कार।
पढ़िए पाञ्चजन्य का नवीन अंक…. pic.twitter.com/kSDSMzfReo
— Panchjanya (@epanchjanya) January 8, 2023
डॉ. मोहन भागवतांच्या संपूर्ण मुलाखतीत हिंदू – मुस्लिम संबंध यावर हिंदुत्वाच्या अनुषंगाने केलेले एक विशिष्ट भाष्य आहे. या देशाची ओळख हिंदू आहे. हिंदुत्व संकल्पना त्यातून आली आहे. किंबहुना राष्ट्रहित आणि हिंदू हित यात द्वैत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. हिंदूंना गेले 1000 वर्षे सतत संघर्ष करावा लागला आहे. युद्धमान परिस्थिती सहन करावी लागली आहे. त्यातून अनेकांच्या प्रयत्नात मधून हिंदू संघटना मजबूत होत आले आहे. आता हिंदू जागृत झाला आहे. त्यामुळे हिंदुत्वाला आता धोका नाही. तसाच भारतात इस्लामलाही धोका नाही, असा आत्मविश्वास त्यांनी जागवला आहे. पण त्याच वेळी त्यांनी मुस्लिमांनी आपण राज्यकर्ते होतो, आपल्याशिवाय दुसरा कोणताही धर्म बरोबर नाही ही भावना सोडून दिली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. नेमक्या या अपेक्षेच्या मुद्द्यावरच काँग्रेससह सर्व विरोधकांनी मोहन भागवतांनी हिंदू – मुस्लिम भेदभाव केल्याचा आरोप केला आहे.
वास्तविक मोहन भागवतांनी हिंदूंनाही अशी भावना सोडून द्यायला सांगितले आहे. पण नेमक्या त्या भागाकडे माध्यमांनी आणि विरोधकांनी दुर्लक्ष करून हिंदू – मुस्लिम भेदभाव केल्याच्या तथाकथित आरोपात मोहन भागवतांना गोवले आहे.
भारतीयांनी एकदा राज्यघटना मान्य केली, सर्वांना समान संधी स्वीकारली, तर तेथे उच्च नीच भाव येतोच कोठे?? त्यामुळे आपण कधीकाळी हिंदुस्थान वर राज्य केले, अशी भावना मुस्लिमांनी सोडून द्यावी, अशी अपेक्षा मोहन भागवतांनी व्यक्त केली तर त्यात चूक काय??, हे मात्र विरोधकांनी सांगितलेले नाही. किंवा माध्यमांनीही त्याकडे लक्ष वेधलेले नाही.
वास्तविक हिंदुत्व दृढमूल झाल्याचा मुद्दा मोहन भागवतांनी विशेषत्वाने अधोरेखित करून सांगितला आहे. त्यावर विरोधकांनी चकार शब्द काढलेला नाही. पण हिंदुत्व दृढमूल का आणि कसे झाले??, याची कारणमीमांसा खरं म्हणजे माध्यमांनी आणि विरोधकांनी करायला हवी. विरोधकांनी ते सत्तेवर असताना जर धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व letter & spirit मध्ये अंमलात आणले असते, तर आज हिंदुत्व संकल्पना जेवढी दृढमूल झाली आहे, तेवढी दृढमूल होऊ शकली असती का??, याचा विचार त्यांनीच करायची गरज आहे. पण ते करायचे सोडून विरोधक माध्यमांच्या मागे लागले आहेत. त्यांनी दिलेल्या उथळ बातम्यांवर विसंबून मोहन भागवतांच्या मुलाखतीवर विरोधी प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. खरं म्हणजे नेमकं हेच विरोधकांचे प्रत्यक्ष क्रिया आणि प्रतिक्रिया या दोन्ही पातळ्यांवर अपयश आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App