वृत्तसंस्था
कवरत्ती (लक्षद्वीप) : राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांना राजकीय हत्येच्या प्रयत्नाबद्दल 10 वर्षांची सक्तमजुरी आणि 1 लाख रुपयांचा दंड कवरत्ती जिल्हा न्यायालयाने ठोठावला आहे. मोहम्मद फैजल यांच्याबरोबर त्यांच्या 4 साथीदारांना देखील तुरुंगवास आणि प्रत्येकी 1 लाख रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. NCP MP Mohammad Faizal sentenced to 10 years in jail for attempt to murder, fined Rs 1 lakh
राजकीय हत्येच्या प्रयत्नाचे संबंधित प्रकरण 2009 मधले आहे. 2009 मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान मोहम्मद फैजल आणि त्यांच्या 4 साथीदारांनी पदनाथ सालीह यांच्यावर हल्ला केला होता. पदनाथ सालीह हे माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. एम. सईद यांचे जावई आहेत. पी. एम. सईद हे लक्षद्वीप मधून आठ निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर लोकसभेवर निवडून गेले होते. ते लोकसभेचे उपसभापतीही होते. त्यांचे जावई पदनाथ सालीह यांच्यावर खासदार मोहम्मद फैजल आणि त्यांच्या 4 साथीदारांनी कवरत्तीजवळ हल्ला केला होता. कवरत्ती जिल्हा न्यायालयात या सर्वांवरील आरोप सिद्ध झाल्याने त्यांना 10 वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी 1 लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
मासे निर्यात घोटाळ्यातही आरोप
मोहम्मद फैजल यांच्यावर फक्त राजकीय हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा लागलेला नाही, तर 2012 मध्ये श्रीलंकेला टूना मासे निर्यातीत घोटाळा केल्याचा आरोपही सीबीआयने त्यांच्यावर केला आहे. लक्षद्वीपच्या स्थानिक मच्छीमारांनी पकडलेले टूना मासे मोहम्मद फैजल यांनी श्रीलंकेला निर्यात केले. परंतु, स्थानिक मच्छीमारांच्या संस्थेला त्याचे पैसे चुकतेच केले नाहीत, असा त्यांच्यावर आरोप आहे. सीबीआयने या प्रकरणात सखोल चौकशी करून त्यांच्याविरुद्ध 2012 मध्ये आरोपपत्र दाखल केले आहे.
मोहम्मद फैजल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार असून 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये ते घड्याळ चिन्हावर लोकसभेत निवडून आले आहेत. कवरत्ती जिल्हा न्यायालयाने ठरवलेल्या शिक्षेविरोधात ते उच्च न्यायालयात अर्ज करणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App