तेलंगणमध्ये देवी कन्याक परमेश्वरीला ४ कोटी रुपयांच्या नोटांचा हार; मंदिरही सजले नोटांनी

वृत्तसंस्था

महाबूबनगर : तेलंगण राज्यातील महाबूबनगर येथे नवरात्रीनिमित्त देवी कन्याक परमेश्वरीची अनोखी पूजा बांधण्यात आली. मुर्तीला नोटांचा हार घालण्यात आला. तसेच मंदिर नोटांनी सजविण्यात आले. या नोटांची किंमत ४ कोटींवर होती.Rs 4 crore currency is used to decorate Goddess Kanyak Parmeshwari in Telangana; The temple is also decorated with notes

तेलंगणाच्या महाबूबनगरमध्ये स्थानिक व्यापारी समुदायाने (आर्य वैश्य संघम) ४,४४,४४,४४४,४४(चार कोटी, चव्वेचाळीस लाख, ४४ हजार, ४४४ रुपये आणि ४४ पैसे) मूल्याच्या चलनी नोटा जमा केल्या आणि त्याच सजावटीसाठी वापरल्या.



रविवारी (ता.१० ) नवरात्रीच्या पाचव्या दिवशी हा उपक्रम राबविण्यात आला. कारण या दिवशी “महालक्ष्मी अवतार” झाल्याचे मानले जाते. त्यामुळे देवी कन्याक परमेश्वरीला माल्यार्पण करण्यासाठी नोटांचा वापर हारासाठी केला. तसेच, संपूर्ण मंदिर सजवण्यासाठी चलन वापरण्यात आले. विशेष म्हणजे, फक्त ५०० रुपये, १०० रुपये, २० रुपये मूल्याचे चलन त्यासाठी वापरले गेले.

Rs 4 crore currency is used to decorate Goddess Kanyak Parmeshwari in Telangana; The temple is also decorated with notes

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात