वलसाड एक्स्प्रेसमध्ये आग विझवताना भीषण स्फोट, आरपीएफ कॉन्स्टेबलचा मृत्यू

अग्निशमन सिलिंडर फुटला; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण


विशेष प्रतिनिधी

मुझफ्फरपूर : येथील रेल्वे स्थानकावर वलसाड एक्स्प्रेसच्या बोगीत झालेल्या स्फोटात एका आरपीएफ जवानाचा मृत्यू झाला. बोगीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. आरपीपीएफच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. त्याचवेळी कॉन्स्टेबल विनोद कुमार यांनी लहान फायर सिलिंडरने (अग्निशामक यंत्र) आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला आणि तेव्हा अग्निशमन सिलिंडरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की विनोद कुमार यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात घबराट पसरली होती. रेल्वे अधिकाऱ्यांनी विनोद कुमार यांना रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.RPF Constable dies in Valsad Express Fire Explosive Blast



वलसाड एक्स्प्रेस सोमवारी सकाळी 6.30 वाजता मुझफ्फरपूर रेल्वे स्थानकावर आल्याचे सांगण्यात येत आहे. काही वेळानंतर रेल्वेच्या एस-८ बोगीच्या टॉयलेटमधून आगीच्या ज्वाला निघू लागल्या. आगीची माहिती मिळताच रेल्वे आणि आरपीएफच्या पथकांनी येथे पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली.

आग आटोक्यात आणण्यासाठी आरपीएफ जवान विनोद कुमारही दाखल झाले. त्यांनी फायर सिलेंडरच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. आगीचा एक सिलिंडर संपला पण आग विझली नाही. दरम्यान, त्यांनी दुसऱ्या फायर सिलिंडरने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. सिलिंडरचे कुलूप उघडताच सिलिंडरचा स्फोट झाला. यामध्ये विनोद कुमार यांचा मृत्यू झाला.

RPF Constable dies in Valsad Express Fire Explosive Blast

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात