विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी भाजपला महाराष्ट्रात एकटे पाडण्याचा डाव पुन्हा एकदा उघड केला. 2014 पासून 2024 पर्यंत घेतलेल्या भूमिकांचा पवारांनी उलगडा करताना अजितदादांसकट बाकी सगळे चालतील, पण भाजप नको, अशी भूमिका मांडून पवारांनी भाजपला महाराष्ट्रात एकटे पाडण्याचा इरादा बोलून दाखवला.Sharad pawar says, no BJP, all others are acceptable!!
भाजपसोबत जायचे नाही ही आपली भूमिका या आधीही होती, आणि यापुढेही राहील, असे सांगत जर कुणाला परत यायचे असेल तर त्यांनी “इंडिया” आघाडीत यावे, अशी लालूच शरद पवारांनी दाखवली. जे सहकारी सोडून गेलेत त्यांना परत यायचे असेल तर यावे, फक्त भाजप नको, अशी भूमिका शरद पवारांनी घेतली. या देशाची सत्ता पुन्हा भाजपकडे गेल्यास ती देशहिताची ठरणार नाही या निष्कर्षापर्यंत आम्ही आलो असून यावेळी लोक आम्हाला संधी देतील, असा दावा शरद शरद पवारांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत केला.
ठाकरेंसोबत जाण्याचा आमचा प्लॅन
2014 असेल वा 2017 साली असेल, भाजपसोबत जायचा निर्णय हा शरद पवारांनीच घेतला होता, 2019 च्या पहाटेच्या शपथविधीसाठीही त्यांचा पाठिंबा असल्याचे याआधी अजित पवारांनी सांगितले होते. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, 2014 साली भाजपला पाठिंबा द्यायचे जाहीर केलं, पण प्रत्यक्षात तो पाठिंबा दिला नाही, तो स्ट्रॅटेजीचा भाग होता. मात्र 2017 साली शिवसेनेला भाजपपासून दूर करून उद्धव ठाकरेंसोबत जायचा आमचा प्लॅन होता, आणि नंतर तो यशस्वी ठरला. जे लोक आता म्हणतात की त्यावेळी भाजपसोबत जायचे ठरले होते, त्यांना भाजपसोबत जायचे नव्हते तर सत्तेसोबत जायचे होते, अशा शब्दात पवारांनी आपल्याच अनुयायांना “एक्स्पोज” केले.
महाराष्ट्रात किती जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील??, असा प्रश्न विचारल्यावर शरद पवार म्हणाले की, आधी 50 % जागा आम्हाला मिळतील असं वाटत होतं. पण सध्या त्यापेक्षा जास्त जागा मिळतील असा ट्रेन्ड दिसतोय. शेवटी लोक काय करतील यावर सगळं अवलंबून असेल.
5 वर्षांपूर्वी राष्ट्रवादीला फक्त 4 जागा मिळाल्या होत्या, काँग्रेसला 1 आणि एमआयएमला 1 जागा मिळाली होती. आता तशी अवस्था नाही. यावेळी भाजपविरोधी वातावरण असल्याने लोक आम्हाला संधी देतील असा दावा शरद पवारांनी केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App