ईडीने के कविता यांना 15 मार्च रोजी हैदराबादमधून अटक केली होती.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शनिवारी (२३ मार्च) भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) राष्ट्रीय अध्यक्ष आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांची कन्या के. कविता यांना राऊस ॲव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. जिथे त्यांची ED कोठडी 26 मार्चपर्यंत वाढवण्यात आली होती.Rouse Avenue Court K. Kavita’s ED custody extended till March 26
कविता यांच्या वकिलाने जामीन अर्ज दाखल केला तेव्हा EDने के. कविता यांच्या कोठडीत पाच दिवसांची वाढ करावी अशी मागणी केली होती, मात्र न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी वाढवली. कविता यांच्या जवळच्या नातेवाईकाच्या हैदराबाद येथील घराची झडतीही घेण्यात येत असल्याचेही ईडीने न्यायालयाला सांगितले.
राऊस अव्हेन्यू कोर्ट के. कविता यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोर्टाने सांगितले की त्या कोर्टरूममध्ये आपल्या मुलांना भेटू शकतात. तत्पूर्वी, न्यायालयात प्रवेश करण्यापूर्वी बीआरएस नेत्या कविता यांनी पत्रकारांना सांगितले की, “माझी अटक बेकायदेशीर आहे, मी न्यायालयात लढणार आहे.” याआधी शुक्रवारी (22 मार्च) सर्वोच्च न्यायालयाने के. कविता यांना धक्का देत जामीन नाकारला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App