T20 World Cup 2024 : रोहित शर्माने केला विश्वविक्रम; ‘ही’ कामगिरी करणारा टीम इंडियाचा पहिला कर्णधार ठरला!

Rohit Sharma sets world record Became the first captain of Team India to score most runs in a single T20 World Cup

टीम इंडियाने टी-20 विश्वचषक 2024 च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. Rohit Sharma sets world record Became the first captain of Team India to score most runs in a single T20 World Cup

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-20 विश्वचषक 2024 च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत त्याने इंग्लंडचा वाईट पद्धतीने पराभव केला. या सामन्यात रोहितने दमदार अर्धशतक झळकावले. त्याने 39 चेंडूंचा सामना करत 57 धावा केल्या. या खेळीच्या जोरावर रोहितने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. एकाच T20 विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा तो पहिला भारतीय कर्णधार बनला आहे. एकूण यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.

टी-२० वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या नावावर आहे. त्याने 2021 मध्ये 303 धावा केल्या होत्या. या यादीत रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने 248 धावा केल्या आहेत. जोस बटलर तिसऱ्या क्रमांकावर आहे. बटलरने 2022 मध्ये 225 धावा केल्या होत्या. केन विल्यमसन 216 धावांसह चौथ्या स्थानावर आहे.



रोहितच्या नावावर आणखी एक विशेष विक्रम नोंदवला गेला आहे. तो T20 विश्वचषकातील जिंकलेल्या सामन्यांमध्ये सर्वाधिक अर्धशतके करणारा खेळाडू ठरला आहे. रोहितने 11 वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. या यादीत कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराटने हा पराक्रम 10 वेळा केला आहे. डेव्हिड वॉर्नर तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 7 वेळा अर्धशतके झळकावली आहेत. तर जोस बटलरने हा पराक्रम 5 वेळा केला आहे.

T20 विश्वचषक 2024 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीवर नजर टाकली तर अफगाणिस्तानचा रहमानुल्ला गुरबाज पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 8 सामन्यात 281 धावा केल्या आहेत. ट्रॅव्हिस हेड दुसऱ्या क्रमांकावर आहे. हेडने ऑस्ट्रेलियासाठी दमदार फलंदाजी करत 7 सामन्यात 255 धावा केल्या आहेत. या यादीत रोहित तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 7 सामन्यात 248 धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादवचाही टॉप 10 खेळाडूंमध्ये समावेश आहे. सूर्यकुमार नवव्या क्रमांकावर आहे. त्याने 7 सामन्यात 196 धावा केल्या आहेत.

Rohit Sharma sets world record Became the first captain of Team India to score most runs in a single T20 World Cup

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात