विशेष प्रतिनिधी
मुंबई : राहुल गांधींची खासदारकी पुन्हा बहाल झाल्यानंतर काँग्रेस अंतर्गत भावा-बहिणींच्या सत्ता संघर्षात पिछाडीवर गेलेल्या प्रियांका गांधी यांच्यासाठी त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी कॅनव्हसिंग सुरू केले. त्यात ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांची भर पडली आहे. Robert Vadra and Sanjay raut canvassing for priyanka gandhi’s loksabha election from varansi against Modi
रॉबर्ट वाड्रांनी प्रियांका गांधी या सर्व गुणसंपन्न आहेत. त्या लोकसभेत हव्यातच. त्यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, असे जाहीर वक्तव्य करताच संजय राऊत सामनाच्या रोखठोक मधून पुढे आले आणि त्यांनी थेट प्रियांका गांधी यांनाच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसीतून “उभे” करून टाकले!!
प्रियंकांचे पती बेभान, बेजबाबदारपणे गाडी चालविल्याप्रकरणी रॉबर्ट वढेरा यांच्यावर गुन्हा दाखल
प्रियांका गांधी यांच्याकडे भरपूर क्षमता आहे. त्या लोकसभेत असतील, तर सरकारचे पुरते वाभाडे काढतील. त्या सर्वगुणसंपन्न आहेत, अशी स्तुतीसुमने रॉबर्ट वड्रांनी दोनच दिवसांपूर्वी उधळली होती.
वाड्रांच्या या वक्तव्यामागे काँग्रेसमधला भावा बहिणींच्या सुक्त संघर्षाची पार्श्वभूमी आहे. राहुल गांधींची खासदारकी बहाल झाल्यामुळे प्रियांका गांधींच्या महत्त्वाकांक्षेला नख लागले आहे. राहुल लोकसभेत राहून भाजप विरुद्ध संघर्ष चालवणार असतील, तर प्रियांका गांधींचे महत्त्व फक्त संघटनात्मक पातळीपर्यंत उरते आणि त्यांना दुय्यम भूमिका स्वीकारावी लागते. सोनिया गांधी 2024 ची निवडणूक लढवणार नाहीत. त्यांच्याऐवजी प्रियांका रायबरेलीतून निवडणूक लढवू शकतात. पण तरी देखील राहुल हेच वरिष्ठ नेते म्हणून त्यांना स्वीकारावे लागतील. हा खरा सुप्त संघर्ष आहे. पण अजून या भावा बहिणींनी तो उघडकीस येऊ दिलेला नाही. मात्र त्याची किनार ठळक दिसू लागली आहे आणि त्यातूनच रॉबर्ट वाड्रांचे प्रियांकांच्या सर्वगुणसंपन्नतेचे वक्तव्य समोर आले आहे.
त्यात संजय राऊत यांनी आज रोखठोक लिहून भर घातली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाराणसी लोकसभा मतदारसंघातली निवडणूक जड जाऊ शकते. प्रियांका गांधींनी तिथून निवडणूक लढविण्याचा सगळ्यांचा आग्रह आहे, असे राऊत यांनी रोखठोक मध्ये लिहिले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोदी विरुद्ध प्रियांका अशी काल्पनिक लढत संजय राऊत यांनी लावून दिल्याचे चित्र दिसत आहे.
पण याचा परिणाम काय होईल?? प्रियांका गांधींचे करिअर बहरेल की सुरू होण्याआधीच करपेल, याचा विचारही राऊतांनी केलेला दिसत नाही. किंबहुना तो विचार अचूकपणे करून प्रियांका गांधींच्या संसदीय करिअरला ते सुरू होण्या आधीच करपण्याची “व्यवस्था” केल्याचे यातून दिसून येत आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App