कॉँग्रेसच्या सरचिटणिस प्रियंका गांधी- वढेरा यांचे पती रॉबर्ट वढेरा यांच्यावर बेभानपणे गाडी चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वढेरा हे आपल्या सुरक्षा रक्षाकांच्या ताफ्यासहीत बारापुला येथून सुखदेव येथील आपल्या कार्यालयात जात असताना हा अपघात घडला.Robert Vadera charged with driving unconscious
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कॉँग्रेसच्या सरचिटणिस प्रियंका गांधी- वढेरा यांचे पती रॉबर्ट वढेरा यांच्यावर बेभानपणे गाडी चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वढेरा हे आपल्या सुरक्षा रक्षाकांच्या ताफ्यासहीत बारापुला येथून सुखदेव येथील आपल्या कार्यालयात जात असताना हा अपघात घडला.
वढेरा यांच्या गाडीने ब्रेक मारल्याने हा अपघात झाला. अचानक गाडी थांबल्याने वढेरा यांच्या गाडीमागून येणाऱ्या त्यांच्याच सुरक्षा रक्षकांच्या गाडीने वढेरांच्या गाडीला मागून धडक दिली. यानंतर पोलिसांनी वढेरांना बेजबाबदारपणे गाडी चालवण्यासाठी दोषी ठरवत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. या दुर्घटनेमध्ये कोणीही जखमी झालेलं नाही.
वढेरा यांची गाडी वेगाने बारापुला पुलावरुन जात होती. अचानक गाडीने ब्रेक दाबला. त्यामुळे मागून येणाºया गाडीचा चालक गोंधळला आणि त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. ही गाडी वढेरा यांच्या गाडीला धडकली.
या प्रकरणामध्ये वाहतूक पोलिसांनी कारवाई करताना बेजबाबदारपणे आणि धोकादायक पद्धतीने गाडी चालवण्याच्या नियमांअंतर्गत १८४ मोटर वाहन कायद्याअंतर्गत म्हणजेच डेंजर्स ड्राइयव्हिंगसाठी दंड करत पावती फाडली.
वढेरा आपल्या ऑ फिसला जात असतानाच वाटेत हा अपघात घडला. अपघात झाल्यानंतर वढेरा हे गाडीची चावी घेऊन कार्यालयात निघून गेले. त्यानंतर तेथील वाहतूककोंडी आणि बेजबाबदार वर्तवणुकीसाठी निजामुद्दीन पोलीस स्थानकामध्ये त्यांच्या गाडीवर चलान फाडण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App