गोध्रा, शीखविरोधी दंगलीची चौकशी करणारे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश नानावटी यांचे निधन, वयाच्या ८६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Retired Supreme Court judge Nanavati Passed Away

judge Nanavati Passed Away : सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश गिरीश ठाकुरलाल नानावटी यांचे शनिवारी निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. त्यांनी 1984 ची शीख विरोधी दंगल आणि 2002च्या गोध्रा दंगलीची चौकशी केली होती. शनिवारी दुपारी १.१५ वाजता गुजरातमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. Retired Supreme Court judge Nanavati Passed Away


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश गिरीश ठाकुरलाल नानावटी यांचे शनिवारी निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. त्यांनी 1984 ची शीख विरोधी दंगल आणि 2002च्या गोध्रा दंगलीची चौकशी केली होती. शनिवारी दुपारी १.१५ वाजता गुजरातमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.

न्यायमूर्ती नानावटी यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1935 रोजी झाला आणि 11 फेब्रुवारी 1958 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे वकील म्हणून त्यांची नोंदणी झाली. 19 जुलै 1979 रोजी त्यांची गुजरात उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि त्यानंतर 14 डिसेंबर 1993 रोजी त्यांची ओडिशा उच्च न्यायालयात बदली झाली. नानावटी यांची 31 जानेवारी 1994 रोजी ओडिशा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली.

त्यानंतर 28 सप्टेंबर 1994 रोजी त्यांची कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. 6 मार्च 1995 रोजी ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले आणि 16 फेब्रुवारी 2000 रोजी निवृत्त झाले. न्यायमूर्ती नानावटी आणि न्यायमूर्ती अक्षय मेहता यांनी 2002 च्या दंगलीचा अंतिम अहवाल गुजरातच्या तत्कालीन मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांना 2014 मध्ये सादर केला होता. गोध्रा दंगलीत 1,000 हून अधिक लोक मारले गेले होते, त्यापैकी बहुतेक अल्पसंख्याक समुदायाचे होते.

२००२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरात दंगलीच्या चौकशीसाठी आयोगाची स्थापना केली होती. गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ साबरमती एक्सप्रेस ट्रेनच्या दोन बोगी जाळण्यात आल्यानंतर ही दंगल उसळली होती. १९८४ च्या शीखविरोधी दंगलीच्या चौकशीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने नानावटी आयोगाची स्थापना केली होती. नानावटी आयोगाचे ते एकमेव सदस्य होते.

Retired Supreme Court judge Nanavati Passed Away

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात