जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे भ्याड कृत्य
विशेष प्रतिनिधी
जम्मू-काश्मीर : बारामुल्ला जिल्ह्यात एका निवृत्त एसएसपीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. गोळी झाडल्यानंतर संशयित दहशतवादी घटनास्थळावरून पळून गेले. दहशतवाद्यांनी मशिदीवरही गोळीबार केला आहे.Retired SSP who went to mosque for Azan shot dead
गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांच्या भ्याड कारवाया वाढत आहेत. पुंछमध्ये लष्कराच्या वाहनावर छुप्या पद्धतीने हल्ला केल्यानंतर त्यांनी आता निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.
काश्मीर झोन पोलिसांनी ट्विट केले आहे की, शेरी बारामुल्ला येथील गंटमुला येथील रहिवाशी मोहम्मद शफींवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. निवृत्त एसएसपी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. मशिदीत अजान देत असताना त्याच्यावर हा हल्ला झाला.
गोळी लागल्याने त्यांना प्राण गमवावे लागले. संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आल्याचे जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले आहे. लोकांना या भागापासून दूर राहण्यास सांगण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App