उज्जैनमध्ये सापडले एक हजार वर्षांपूर्वीचे पुरातन मंदिराचे अवशेष

मध्य प्रदेशातील धार्मिक नगरी असलेल्या उज्जैनमधील ज्योतिलिंग महाकाल मंदिराजवळ सुरू असलेल्या उत्खननात सुमारे एक हजार वर्षे पुरातन मंदिराचे अवशेष सापडले आहेत. पुरातत्व विभागाच्या देखरेखीखालील उत्खननात हे अवशेष मिळाले आहेत.Remains of a thousand year old temple found in Ujjain


विशेष प्रतिनिधी

भोपाळ : मध्य प्रदेशातील धार्मिक नगरी असलेल्या उज्जैनमधील ज्योतिलिंग महाकाल मंदिराजवळ सुरू असलेल्या उत्खननात सुमारे एक हजार वर्षे पुरातन मंदिराचे अवशेष सापडले आहेत. पुरातत्व विभागाच्या देखरेखीखालील उत्खननात हे अवशेष मिळाले आहेत.

लवकरच या मंदिराचे मुळ अवशेष समोर हेण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत झालेल्या उत्खननात मंदिराचे दगडी खांब, छत, शिखर यांचे अवशेष मिळाले आहेत. त्याचबरोबर दोन हजार वर्षे पुरातन असलेल्या शृंग व कुषाण काळातील मातीची भांडीही मिळाली आहेत.



उत्खननात मिळालेल्या सर्व अवशेषांना मंदिराच्या जवळच ठेवण्यात आले आहे. सुमारे पंधरा दिवसांपासून हे उत्खनन सुरू आहे. शुक्रवारी पहिल्यांदा एक हजार वर्षांपूर्वीच्या मदिंराचा पाया मिळाला. लवकरच मंदिराचा मुळ भाग समोर येण्याची आशा आहे.

मध्य प्रदेश मंदिर देवस्थान प्रबंध समिती आणि मध्य प्रदेश सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने याठिकाणी सुमारे चारशे कोटी रुपये खर्च करून नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यासाठी मंदिराच्या जवळ हे खोदमाक केले जात आहे.यापूर्वी डिसेंबर महिन्यात याठिकाणी एक हजार वर्षांपूर्वीचे मंदिर असल्याचे पुरावे मिळाले होते.

त्यानंतर मध्य प्रदेश पुरातत्व विभागाने पुरातत्व विभागाची चार सदस्यीय समिती नेमण्यात आली. खोदकामाची पाहणी केल्यानंतर पुरातत्व विभागाने अहवाल दिला होता. त्यानंतर आयुक्तांनी महाकाल मंदिराचा गौरवशाली इतिहास समोर आणण्यासाठी पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली उत्खनन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Remains of a thousand year old temple found in Ujjain

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात