ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मेटाकुटीस आलेल्या महाराष्ट्रासह अनेक राज्यांना रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्याकडून प्राणवायू मिळाला आहे. आपल्या जामनगर रिफायनरीमध्ये दररोज 700 टनांहून अधिक मेडिकल-ग्रेड ऑक्सिजन रिलायन्स तयार करत असून महाराष्ट्रासह अनेक राज्यांना राज्यांना हे ऑक्सिजन विनाशुल्क दिले जात आहे. Reliance’s Mukesh Ambani supplies 700 tonnes of oxygen to several states, including Maharashtra
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मेटाकुटीस आलेल्या महाराष्ट्रासह अनेक राज्यांना रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्याकडून प्राणवायू मिळाला आहे. आपल्या जामनगर रिफायनरीमध्ये दररोज 700 टनांहून अधिक मेडिकल-ग्रेड ऑक्सिजन रिलायन्स तयार करत असून महाराष्ट्रासह अनेक राज्यांना राज्यांना हे ऑक्सिजन विनाशुल्क दिले जात आहे.
कोरोनामुळे देशात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा वापर लक्षात घेता रिलायन्सने अधिक ऑक्सिजन तयार करण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी रिलायन्सलाही आपल्या उत्पादन पद्धती बदलण्याची गरज होती. गुजरातमधील कंपनीच्या जामनगर रिफायनरीने सुरुवातीला 100 टन वैद्यकीय दर्जाच्या ऑक्सिजनचे उत्पादन केले, जे आता त्वरित 700 टन करण्यात आले.
(कोरोना संक्रमणाने ग्रस्त असलेल्या गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांसारख्या राज्यात पुरविल्या जाणाºया पुरवठ्यामुळे दररोज 70,000 हून अधिक गंभीर रुग्णांना दिलासा मिळणार आहे. लवकरच कंपनीची वैद्यकीय ग्रेड ऑक्सिजन उत्पादन क्षमता वाढवून 1000 टन करण्याची योजना आहे.
रिलायन्सच्या जामनगर रिफायनरीमध्ये कच्चे तेल डिझेल, पेट्रोल आणि जेट इंधनासारख्या उत्पादनांची निर्मिती करते, जिथे मेडिकल-ग्रेड ऑक्सिजन तयार होत नाही. परंतु कोरोनो व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांमुळे ऑक्सिजनची मागणी वाढलीय. ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता रिलायन्सने वैद्यकीय दर्जाच्या ऑक्सिजनची निर्मिती करण्यास सक्षम असलेली यंत्रणा बसविली. मेडिकल ग्रेड ऑक्सिजन तयार करण्यासाठी औद्योगिक ऑक्सिजन तयार करण्याच्या सुविधांचा उपयोग केला जात आहे.
भारतातील राज्यांमध्ये दररोज सुमारे 700 टन ऑक्सिजन चा पुरवठा केला जात आहे. यामुळे दररोज 70,000 हून अधिक गंभीर आजार झालेल्या रुग्णांना दिलासा मिळेल. विशेष म्हणजे टँकरमध्ये मायनस 183 डिग्री सेल्सियसमध्ये ऑक्सिजन ठेवला जातो. परिवहन खर्चासह राज्य सरकारांना विनाशुल्क ऑक्सिजन दिले जात आहे. हा कंपनीच्या सीएसआर उपक्रमाचा एक भाग आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App